संपादक---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
टेंभुर्णी ता. माढा जि .सोलापूर येथे ऑल इंडिया युवक काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदयभानु चिंब महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल दादा राऊत,युवक काँग्रेस झारखंडचे एहसान खान यांच्या नेतृत्वाखाली आणि,प्रदेश उपाध्यक्ष- शिवराज मोरे- प्रशांत ओगले सुनंजय पवार ,दिपक राठोड, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई ,बेरोजगारी, पेपर फुटी जिवनावश्यक वस्तुंचे वाढालेले दर आणि केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विरोधात टेंभुर्णी याथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
टेंभुर्णी येथील करमाळा चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात "वारे मोदी तेरा खेल- सस्ती दारू महंगा तेल " "देशात महागाई व बेरोजगारी निर्माण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" "राहुल गांधी तुम आगे बढो -हम तुम्हारे साथ है "अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
याप्रसंगी टेंभुर्णी पोलिसांनी आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करत काँग्रेस कमिटीचे युवक प्रदेशाध्यक्ष" कुणाल दादा राऊत" व इतर नेत्याना यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र कार्यकर्ते त्याला विरोध करत होते त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी चक्क टमटम चा वापर करण्याचा व त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध करत कुणाल दादा राऊत हे प्रदेशाध्यक्ष असून त्यांना आम्ही टमटम मध्ये घेऊन जाऊ देणार नाही आशी भूमिका घेत तुम्हाला अटक करायची असेल पोलीस प्रशासनाची गाडी मध्येच घेऊन जा असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आणि पोलीस प्रशासनाकडे गाडी नसेल तर आम्ही पोलीस स्टेशनला चालत येतो असे सांगत ते पोलीस स्टेशनच्या दिशेने चालत निघाले या वेळी गृहखात्याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या , त्यानंतर पाठीमागून पोलीस प्रशासनाची गाडी आली आणि त्यांना पोलिसाच्या गाडीत बसून पोलीस स्टेशनला घेऊन गेले याप्रसंगी संतप्त कार्यकर्त्यांनी "मोदी सरकार डरती है पोलीस को आगे करती है" अशा घोषणा दिल्या त्यानंतर कुणाल दादा राऊत म्हणाले की आज राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे गाडी उपलब्ध नाही हे दुर्दैवच असून हे कशाप्रकारे राज्य चालवतात फडणवीस यांच्या गृह खात्याची अवस्था दयनीय असुन हे सरकार फक्त आणि फक्त अश्वसना शिवाय काहीच करत नाही . शिवाय येणारा काळ हा काँग्रेसचाच असून 2024 मध्ये केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असून भारतीय जनता पार्टीच्या हुकूमशाही धोरणाला देशातील जनता कंटाळले असून देशातील जनता आगामी निवडणुकची प्रतीक्षा करत आहेत. आणि 2024 मध्ये देशातील जनता काँग्रेसला निवडून देऊन भारतीय जनता पार्टीला योग्य ती जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही
याप्रसंगी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीण प्रभारी प्रवीण जाधव सोलापूर जिल्हा युवक सरचिटणीस किशोर राजे गाडे सौरभ रुपनवर श्रीपुर शहराध्यक्ष रोहित काळे वाफेगाव सरपंच शहाजी गाडे संगम ग्रामपंचायतचे सदस्य आकाश पराडे पाटील लखन शेंडगे सचिन शिंदे सुरज गाडे पोपटइंगळे यांच्या सह सोलापूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा