Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

बहुजन ब्रिगेडच्या पाठपुराव्यामुळे अकलूज चांदपुरी बस चालू गावकऱ्यांनी मानले आभार







 अकलूज ---- प्रतिनिधी लक्ष्मीकांत-कुरुडकर. 

मो. 7020665 407

                         अकलूज - माळशिरस,मोटेवाडी,तरंगफळ,चांदापुरी ते पिलीव एसटी गेली ४ वर्षे बंद होती,ती पाठपुरावा करून अखेर चालू केली आहे,,,एसटीची फेरी माळशिरस येथील एसटी स्टँड येथून सुरु होताना एसटी चालक वाहक यांचा आणि पाठपुरावा केल्याने माळशिरस कारांच्या वतीने आणि पिलीव कारांच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला आणि चांदापुरी गावच्या वतीने आभार मानले









आता खरी जबाबदारी आहे ती माळशिरस,मोटेवाडी,तरंगफळ, चांदापुरी,आणि पिलीव मधील जनतेची,विद्यार्थी यांची यांनी जर या एसटीने प्रवास करून एसटीला उत्पन्न मिळवून दिले तरच एसटी नियमित चालेल उत्पन्न न मिळाल्यास एसटी पुन्हा बंद होईल,त्यामुळे महिलांना ५०% सवलत आहे,तसेच ७५ वर्षाच्या वर असलेल्या महिला व पुरुष यांना मोफत प्रवास आहे याचा लाभ घेवून सर्वांनी एसटीचा प्रवास करून एसटी नियमितपणे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे...…









एसटी चालू करण्यासाठी मी पाठपुरावा करून चालू केली आहे,,, ती चालू ठेवायची का बंद करायची ती संबंधित गावातील विद्यार्थी,आणि जनतेचे काम आहे....


सदर एसटीच्या स्वागत कार्यक्रमास माळशिरस येथे यावेळी माळशिरस नगरपंचायत चे नगरसेवक कैलास वामन,बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे, दत्ता बुवा वाघमोडे,रशीद शेख,सोपान वाघमोडे,धुळा वाघमोडे बाळासाहेब जंगले महादेव धाईंचे किरण गायकवाड संजय तरडे लक्ष्मण कटके वाहतूक नियंत्रक महेश मदने विष्णुपंत वाघमोडे शिवाजी खंडागळे सुरज मोहिते विजय लांडगे तर चांदापुरी येथे सरपंच,डॉ.कुमार लोंढे व ग्रामस्थउपस्थित होते तसेच पिलीव येथे आरिफ भाई पठाण,नितीन कपणे,जीवन गुरव,कुमार लोखंडे,राजाभाऊ जामदार,दामू लोखंडे,अशोक घोंगडे,दत्तू भैस,संतोष पडळकर,दादा वगरे,लक्ष्मण काळे,मौला मुलाणी,महावीर गांधी,दिलीप लोखंडे,पत्रकार सुजित सातपुते,पत्रकार संजय पाटील सर,चोरमले साहेब उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा