ज्येष्ठ -----पत्रकार श्रीपुर
बी.टी. शिवशरण.
मो.9579 177 671
श्रीपूर महाळुंग परिसरात गेले अनेक दिवसांपासून खाजगी सावकारी बोकाळली असून अडलेल्या नडलेलया व गरजु लोकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना भरमसाठ व्याज दर आकारून त्यांची अडवणुक पिळवणूक होत आहे त्यामुळे या भागातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत होण्याच्या मार्गावर आहेत खाजगी सावकारी करणाऱ्यांची दहशत आहे व्याजाने पैसे देताना गरजू लोकांकडून कोरे कागद कोरे धनादेश जागा लिहून घेतली जाते भरमसाठ व्याज वाढतं घेतलेले कर्ज दुप्पट चौपट होते कर्जाची परतफेड होत नसल्याने जागा घर लिहून घेतलं जाते मागील तीन चार वर्षांत काहींनी खासगी सावकारांच्या त्रासाला व दहशतीला कंटाळून आत्महत्या केल्याचे चित्र आहे खासगी सावकारांच्या पाशात अडकलेली अनेक कुटुंबे न्यायाच्या व संरक्षणासाठी आर्त टाहो फोडत आहेत पण कोणीच कोणाला विचारत नाही सर्वसामान्य माणूस यांना येथील राजकीय नेत्यांकडून आधार संरक्षण न्याय मिळत नाही अशी ओरड दबलेला पिचलेला आर्थिक अडचणीत सापडलेला माणूस करत आहे या सर्व गदारोळात येथे आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातय अशी स्थिती सर्वच पातळीवर आहे इथं गावाच्या विकासासाठी भल्यासाठी स्थानिक सत्ताधारी नेते काम करत नाहीत आपसातील मतभेद कुरघोड्या गटबाजी नेतृत्वाचा अहंकार यांतच ते एकमेकांना पहात झुंजत राहिले आहेत त्यामुळे अक्षरशः सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा