सोलापूर जिल्हा आरपीआय आठवले गट कार्यकारिणी निवडण्यात विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ
बी.टी. शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9579 177 671
सोलापूर जिल्हा आरपीआय आठवले गट अध्यक्ष सरचिटणीस ही काही महत्वाची निवड होऊन सुमारे दिड वर्षांहून अधिक काळ होत आहे मात्र उर्वरित जिल्हा कार्यकारिणी निवड अद्याप झालेली नाही त्यामुळे जिल्ह्यात आरपीआय आठवले गट कार्यकर्त्यांत मरगळ आल्याचे चित्र आहे पक्षाला निवडणूक आयोगाने राजकीय मान्यता दिल्याने पक्षाचे क्रियाशील सभासद नोंदणी सुरू आहे अपेक्षित कामगिरी पक्षाची सभासद नोंदणी सुरू आहे मात्र गेल्या आठ महिन्यांपासून वारंवार क्रियाशील सभासद नोंदणी करण्यासाठी अनेकदा आवाहन मिटिंग घेऊन वरिष्ठ नेते कार्यकर्ते स्थानिक तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना सांगत आहेत काही तालुक्यात क्रियाशील सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत काही कार्यकर्ते जिल्हा कार्यकारिणी निवड होण्यासाठी प्रयत्नशील आहेत जिल्हा कार्यकारिणी निवड विलंब का होत आहे या बाबत वरिष्ठ नेते यांनी खुलासा केल्यास विलंबाचे कारण समजू शकेल आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे काही नाराज कार्यकर्त्यांनी खाजगीत बोलताना सांगितले काहींनी उघड नाराजी व्यक्त केली आहे की महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे जेव्हा जिल्ह्यात दौरा कार्यक्रमास उपस्थित असतात तेव्हा त्यांच्या अवतीभवती व पुढे पुढे तेच तेच ठराविक नेते कार्यकर्ते असतात ग्रामीण भागातील नवीन कार्यकर्ते तसेच ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळ पक्ष बांधणीसाठी घालवले असे जुने नवे मधले कार्यकर्ते यांना त्यांच्या पर्यंत पोहचू दिलं जातं नाही तालुक्यात कार्यक्रम असू द्या जिल्ह्यात असू द्या तसेच रामदास आठवले यांचा अचानक दौरा कार्यक्रम यावेळी ठराविक तेच तेच चेहरे सोडले तर इतरांना आठवले साहेब राजाभाऊ सरवदे यांच्या पर्यंत पोहचू न देण्याची खबरदारी काही नेते कार्यकर्ते करतात असा आरोप मधल्या फळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे सोलापूर जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटात कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात चैतन्य मेळावा मार्गदर्शन शिबिर घेण्याची गरज आहे पक्षातील आक्रमक चेहरे वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व संघटन कौशल्य असणारे गुणवत्ता जपण्यासाठी अशा कार्यकर्त्यांना संघटीत करुन पक्षाचे कामासाठी त्यांना संधी दिली पाहिजे पक्षाचे जडणघडण उभारणीत वक्तृत्व नेतृत्व लिखाण करून सामाजिक राजकीय ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणारे युवक कार्यकर्ते नेते यांना सन्मानित केले पाहिजे तरच पक्ष पुढे जाईल संघटन मजबूत होईल पक्षाचे नावावर दलाली करणारे काही नेते गावपातळीवर तालुका पातळीवर तसेच जिल्ह्यात मिरवतात त्यांचे नेतृत्वाचे दुकान चालवण्यासाठी ते इतरांना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचू व देत नाहीत अशी ओरड आहे या बाबतीत खरेच तशी परिस्थिती व वातावरण असेल तर मात्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा