केंद्रीय राज्यमंत्री "रामदास आठवले "यांचा दिनांक 14 सप्टेंबर रोजी होणार 'ग्रेट ब्रिटन 'च्या पार्लमेंट मध्ये सत्कार
श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9527 456 958
मुंबई दि.13 - ग्रेट ब्रिटन च्या लंडनमधील ब्रिटिश पार्लमेंट मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या लंडनमधील प्रतिष्ठित संस्थेतर्फे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये ना. रामदास आठवले यांचा डॉक्टर भीमराव आंबेडकर अवॉर्ड 2023 या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड प्रमुख ऍड.संतोष शुक्ला यांनी दिली आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड च्या निमंत्रणावरून ना.रामदास आठवले आज दि.13 सप्टेंबर रोजी पहाटे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला रवाना झाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा