Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सन 2023 चा औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान.

 


टेंभुर्णी( बेंबळे )--प्रतिनिधी 

 मुकुंद -रामदासी

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो.9960 202 630

                           ‌डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया पुणे या संस्थेकडून आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास सन 2023 चा औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार दि.24/9/2023 रोजी पुणे येथे देऊन गौरविण्यात आले.     


डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया पुणे ही संस्था देशातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून साखर कारखानदारीतील आधुनिक तंत्रज्ञान संबंधी मार्गदर्शक पुस्तिका व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे करिता प्रशिक्षण आयोजित करून मार्गदर्शन केले जात आहे. या संस्थेमार्फत प्रतिवर्षी देशातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे अर्थिक , तांत्रिक व इतर मुल्यमापन करुन औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे. डेक्कन शुगरच्या कमिटीने सन 2023 साठी आमदार बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने अल्पावधीत साधलेल्या 

प्रगतीचे मुल्यमापन करुन कारखान्याची या पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड केलेली 

आहे .आमदार बबनराव शिंदे यांचा साखर कारखानदारीतील अभ्यास व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने केलेली चौफेर प्रगती याचा विचार करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी यापूर्वी डेक्कन शुगर या संस्थेचे अध्यक्षपद भूषवून या संस्थेस उर्जितवस्था प्रदान केलेली आहे.      

                      

या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 24/ 9/ 2023 रोजी पुणे येथे डेक्कन शुगर या संस्थेच्या वार्षिक अधिवेशनामध्ये करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर पुरस्कार कारखान्याचे संचालक तथा माढा पंचायत समितीचे मा.सभापती विक्रमसिंह बबनराव शिंदे व कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे यांनी स्विकारला. सदर प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रोसेस पी.एस.येलपले, वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाने, डेक्कन शुगरचे अध्यक्ष एस.एस.भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर,साखर संघ, मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ,नॅशनल फेडरेशन,नवी दिल्ली चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व आदी मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा