इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
- गणेशवाडी येथील जलजिवन मिशन योजनेतंर्गत हर घर जलच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतू मोटार, पाईप व रिटर्न वाॅल्वच्या चोरीने काम मंदावले आहे. दरम्यान चोरीची तक्रार संग्राम तुकाराम घोगरे यांनी बावडा दुरक्षेत्र पोलीसात केली आहे.
गणेशवाडी, शिंदेवस्ती व कुदळेवस्तीसाठी जलजिवन मिशन योजनेतंर्गत हर घर जलच्या पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी २१ लाखांचा निधी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केला आहे. त्याच्यातून फिल्टरच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावासाठी स्वतंत्र मोठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
सदर योजनेचा लाभ नागरिकांना मिळणार असून यातून राजकीय फायदा तोटा कोणास होवो ना होवो परंतू समाजातील काही वर्ग याकडे राजकीय फायदा तोट्याचा विचार करून अशा पध्दतीने खोड्या करत असावा असा समज आहे. पुर्णत्वास येत असलेली योजना रखडवण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे.
परंतू बावडा दुरक्षेत्र पोलीसांनी सदर चोरीच्या छडा लावून चोरांना चांगली अक्कल घडवावी अशी मागणी होत आहे. तसेच फिल्टर पाण्याची योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा