ज्येष्ठ -पञकार,बी.टी.शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9527 456 958
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत यांचे वतीने आज संध्याकाळी सहा वाजता प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये डास निर्मूलन फवारणी सुरू केली
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत यांचे वतीने आज संध्याकाळी सहा वाजता श्रीपूर परिसरात डास निर्मूलन फवारणी सुरू केली आहे त्याबद्दल नागरिकातुन समाधान व्यक्त केले आहे आज सोशल मीडिया वर महाळुंग श्रीपूर परिसरात डेंग्यू ने नागरिक त्रस्त अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते त्याची दखल नगरपंचायत ने घेतली आहे महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मधील फागिंग मशीन नादुरुस्त असल्याने अकलूज नगरपरिषद यांचे कडून सदर मशीन मागवण्यात आली आहे नगरपंचायत चे कर्मचारी रघूनाथ चव्हाण शिवाजी चव्हाण जाधव वाघमारे यांनी प्रत्यक्ष फिरून मोटारसायकल वरून डास निर्मूलन फवारणी सुरू केली आहे श्रीपूर परिसरात सगळीकडे गवत उगवले आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याचे दिसून येते येत्या चार दिवसांत संपूर्ण श्रीपूर परिसरात फवारणी केली जाईल अशी माहिती नगरपंचायतचे वतीने देण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा