महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकच्या उपाध्यक्षपदी संग्रामसिंह पाटील यांची नियुक्ती
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संग्रामसिंह प्रशांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
संग्रामसिंह पाटील यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. तसेच पक्षाने त्यांना तुळजापूर व गेवराई विधानसभा मतदार संघाचे पक्ष निरीक्षक म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुळे, माजी सभापती प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व मान्यवरांच्या उपस्थितीत संग्रामसिंह पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
निवडी प्रसंगी संग्रामसिंह पाटील म्हणाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ताकद युवकांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आगामी सर्वच निवडणूकात पक्षाची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
फोटो - मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र स्वीकारताना संग्रामसिंह पाटील.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा