*उपकारांची परतफेड म्हणून बैलपोळा...!
गणेशगाव प्रतिनिधी
नूरजहान शेख
गणेशगांव (नूरजहाँ शेख यांजकडून)
मातीतून सोन पीकवायला मदत करणारा बळीराजाचा सखा म्हणजे बैल.वर्षभर शेतकऱ्या सोबत शेतात राबून धान्याची रास लावायला मदत करतो.त्याच्या उपकारांची परतफेड हा बैलपोळा साजरा करून केली जाते.या दिवशी बैलाला साबण लावून अंघोळ घालतात रंग लावून कंडे गोंडे लावून गळ्यात घुंगराची चंगाळी बांधून पाठीवरती झुल चढवून शिंगाणा फुले गोंडे लावून सजवले जाते.घरतील सुहासिनी महिला बैलाला हळदी कुंकू लावून ओवाळून पुरणपोळीचा नैवैद्य बैलांना भरवला जातो आणी हलगी ढोल फटाक्यांच्या आतिषबाजीत गावातून मिरवणूक काढली जाते.ज्यांच्या कडे बैल नाहीत अशा घरातील महिला या मातीच्या बैलांची जोडी बाजारातून खरेदी करून पूजा करून पुरणपोळीचा नैवद्य दाखवतात.या दिवशी बैलाला औताला जुपले नाहीत किंवा कोणतेही काम करवून घेत जात नाहीत.खेड्यापाडातून हा सन अजून हि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.सर्वच जातीधर्माचे लोक साजरा करतात.बैलपोळ्याचा हा दिवस शेतकऱ्याचा आनंदाचा दिवस असतो.वर्षभर् केलेल्या कष्टाची जाणीव शेतकऱ्याला असते त्याची कृतज्ञता उपकारांची परतफेड म्हणून हा दिवस ग्रामीण भागात साजरा केला जातो.
बैलांबरोबर शेतकऱ्यांची सर्व गुरे गाई म्हशी शेळ्या यांना ही सजवले जाते परंतु मिरवणूक फक्त बैलांचीच काढली जाते. आपली ही भारतीय संस्कृतीची जपणूक खऱ्या अर्थाने खेड्या पाड्यातच पहायला मिळते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा