इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गणरायाने दुष्काळाचे संकट दूर करावे, असे साकडे गणरायाकडे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील गणरायाकडे साकडे घातले.
माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील निवासस्थानी कुटुंबासमवेत गणरायाचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांच्या पत्नी, जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.
हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. राज्याचा दोन तृतीयांशपेक्षा जास्त भाग आज दुष्काळाच्या छायेत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचा, जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच छोट्या-मोठ्या उद्योगांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व कुटुंबांमध्ये गणरायांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाते, तसेच हा उत्सव देशभर आनंदाने साजरा केला जातो. गणरायाचे एकरूप म्हणजे विघ्नहर्ता असून, महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे ते दूर करण्यासाठी एवढ्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून हे संकट टळू दे, अशी प्रार्थना या वेळी हर्षवर्धन पाटील केली.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा