तालूक्यावरील दुष्काळाचे सावट दुर होण्यासाठी सर्वदूर धोधो पाऊस पडून बळीराजावरील संकट दूर कर - आमदार दत्तात्रय भरणे
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
- राज्यावर तालूक्यावर दुष्काळाचे सावट असून, सर्वदूर धोधो पाऊस पडून बळीराजावरील संकट दूर कर, असे संकटमोचक गणरायाला आमदार दत्तात्रय भरणे यांनी साकडे घातले.
इंदापूरचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया', ‘मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात 'श्रीं'च्या मूर्तीचे विधिवत पूजन करत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर आमदार भरणे, पत्नी सारिका, मुलगा श्रीराज, भाऊ आबासाहेब व कुटुंबातील सर्व सदस्यांनी गणरायाची आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार भरणे म्हणाले की, पाऊस नसल्याने तालुक्यातील पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. माझा शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत आहे. त्यामुळे आपण गणरायाला पावसासाठी साकडे घातले असून, येणाऱ्या काही दिवसांत निश्चित पाऊस पडेल, अशी आपणास खात्री असल्याचे ते म्हणाले.
मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांनी इंदापूर तालुक्यात बेकायदेशीर खडी क्रशर सुरू असल्याचा आरोप करून इंदापुरात माजी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत आमदार भरणे म्हणाले की, बेकायदेशीर क्रशर असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आपण सूचना केल्या आहेत. मात्र, जे लोक असा आरोप करीत आहेत, त्यांचे नेमके उपजीविकेचे साधन काय? हे जर तपासले तर हे काय सुरू आहे, त्याचे उत्तर मिळेल. मी अशा लोकांची नावे घेऊन त्यांना मोठे करणार नाही आणि त्यांच्या आरोपांना महत्त्वही देत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा