संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
करमाळा तालुका साहित्य मंडळ आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने काल कवी दादासाहेब सुभाष पिसे यांच्या "प्रवासात" या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील 'विजयश्री' सभागृहात सुप्रसिद्ध कवी प्रा..सुरेश शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी .प्रकाश (तात्या)लावंड होते.
प्रमुख पाहुणे म्हणून 'प्रेमाचा झांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं' फेम सुप्रसिद्ध कवी श्री.नारायण पुरी होते.विद्या विकास मंडळाचे सचिव .विलासराव घुमरे , .मिलिंद फंड (अध्यक्ष- विद्या विकास मंडळ), करमाळा तालुका साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष व आधारस्तंभ प्रा.नागेश माने (बापू) करमाळा तालुका साहित्य मंडळाचे सल्लागार,मार्गदर्शक ॲड.बाबुराव हिरडे, .शीतलताई करे-पाटील, डॉ..कविता कांबळे प्रमुख उपस्थितांमध्ये होते.
प्रसिद्ध गायक प्रवीण अवचर व संदीप पाटील, उद्धव साळुंखे सर,ग्लोबल सांयन्स इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा.महेश निकत,प्रा .अश्विनी निकत, बाळासाहेब गोरे सर, कमलाई अबँकस सेंटर च्या संस्थापिका मंजुश्री मुसळे, जिनिअस अबँकस प्रोऍक्टिव्ह सेंटर च्या संस्थापिका कु.अंकिता वेदपाठक व कवी साहित्यकासह विविध क्षेत्रातील मान्यवर खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुप्रसिद्ध कवी प्रा.सुरेश शिंदे आणि सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्या बहारदार कवितांचा श्रोत्यांनी आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन .गौरी दादासाहेब पिसे यांनी केले.तर प्रास्ताविक ह.भ.प. प्राची महाराज सरवदे यांनी केले व उपस्थितांचे आभार करमाळा तालुका साहित्य मंडळाचे सचिव प्रसिद्ध कवी दीपक लांडगे (ओडिसियस) यांनी मानले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी करमाळा तालुका साहित्य मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख कवी खलील शेख ,कवी संतोष कांबळे, आदर्श शिक्षक रमेश नामदे सर, सागर गायकवाड,विशाल परदेशी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा