Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

भीमा नदी काठचा विद्युत पुरवठा दोन दिवसात सुरळीत करा अन्यथा--- अकलूज महावितरण च्या कार्यालयामध्ये जनावरे बांधू-- गणेश इंगळे

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स - 45 -न्युज मराठी

मो.9730 867 448

                         युवा सेना सचिव वरून सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे युवा सेना उपजिल्हाप्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना उपतालुकाप्रमुख दत्ता साळुंखे यांच्या उपस्थितीत अकलूज महावितरण कंपनीचे अधिकारी अण्णासाहेब काळेसाहेब यांना निवेदन देण्यात आले.



सध्या भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडले असल्यामुळे नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे शेतातील पिके होरपळून चालेली आहेत . भीमा नदीचे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी अजून दहा दिवस लागत आहेत . या दहा दिवसांमध्ये उरलेसुरलेली सुद्धा पिके जळून जातील यामुळे तात्काळ भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा युवासेनेच्या वतीने अकलूज महावितरण कंपनीमध्ये जनावरे आणून बांधण्याचा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे देण्यात आलेला आहे यावेळी चंदू नाना पराडे गणेश भिताडे लावा पराडे ओम पराडे अक्षय पराडे विकास भोई आप्पा भोई ओम पराडे तुषार राऊत निखिल देशमुख अर्जुन लोखंडे अक्षय नाईक नवरे अविराज पराडे माऊली पराडे अविनाश पराडे ई शेतकरी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा