इक्बाल --मुल्ला ,सांगली.
स्वतः कष्ट केल्यावरच पैशाची किंमत कळत असते ,बापाच्या पैशावर ऐष करून उधळपट्टी करणाऱ्या मुलांना पालकांनी शैक्षणिक श्रीमंत षकरून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना आत्मनिर्भर करणे आवश्यक आहे .
तरुणांचे अति लाड करत ,महिन्याला हजारो रुपये देऊन त्यांना मानसिक अपंग बनवत ,त्यांचा स्वाभिमान हिरावणाऱ्या तरुणांच्या पालकांची व्यथा अंगावर शहारे आणणारी ठरत आहे .
वडिलांच्या पैशावर हॉटेल - सिगरेट - मावा व अंमली पदार्थाचे सेवन करत संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या तरुणाईचे समाजप्रबोधन कोण करणार ???
आज पालक हवालदिल आहेत . कारण तरुणवर्ग त्यांचे "ऐकत" नाहीत , जास्त बोलले तर शब्दांचे "धारदार वार" करत आई -वडिलांनाच "घराबाहेर" काढण्याची किंवा स्वतः घर सोडून जाण्याची धमकी मुलांकडून येत आहे . या सर्व प्रकाराला जबाबदार कोण ?? ही मुस्कटदाबी झेलण्याची पालकांची कुवत असते का ???
लहानपणापासून एका शिक्षकाची भूमिका वठवत पालकांनी सकारात्मक बदलाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांचे "लाड" अवश्य करावेत तथापि मुलांच्या चुकांना आई -वडील पांघरून घालतात. मुलाच्या चुकीला "प्रबोधन" न करता, त्याची पाठराखण करण्याची चूक केली जाते .
शैक्षणिक अशिक्षितता आणि आर्थिक सुबत्ता धनदौलत यामुळे तरुणाई शारीरिक - मानसिक आणि सामाजिक क्षेत्रात नापास झालेली दिसते.
स्वतः कष्ट करून ,आदर्श संस्कार देऊन , मुलांना स्थिरस्थावर करणाऱ्या पालकांची आदर्श मुले ही त्यांची भविष्यातील संपत्ती असते .
एका हॉटेल मधील मॅनेजर - माझे मित्र शंतनू घळसासी यांची त्यांच्या "मुलांच्या" बाबतीत घडलेली "शैक्षणिक श्रीमंती" इतर पालकांच्यासाठी आदर्शवत आहे .
पालक एका कुंभाराप्रमाणे आपल्या चांगल्या - वाईट जडणघडणीचे शिल्पकार असतात . या लेखाचा "माझ्यासह" सर्व पालकांनी बोध घ्यावा हा प्रांजळ हेतू आहे .
बँकेचे कर्ज काढून , "हाडाची" काडे व "रक्ताचे" पाणी करून आपल्या मुलांना शैक्षणिक श्रीमंत बनवणाऱ्या समस्त पालकांचे जितके "कौतुक" करावे तितके कमी आहे .
आ . इकबाल मुल्ला ( पत्रकार ) संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा