Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

अकलूज येथील बसवेश्वर चौकातील महादेव मंदिरात सामूहिक रुद्र पठण कार्यक्रम संपन्न

 अकलूज येथील बसवेश्वर चौकातील महादेव मंदिरात सामूहिक रुद्र पठण कार्यक्रम संपन्न


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                 अकलुजमधील बसवेश्वर चौक येथील जागृत महादेव मंदिर येथे मंगळवार दिनांक १२ /०८/२०२३ प्रदोष दिवशी वीरशैव लिंगायत समाज मंडळ, उमा-शंकर महिला रुद्र मंडळ व महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, अकलूज आयोजित सामूहिक रुद्र पठण कार्यक्रम ष.ब्र.१०८ राजगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, शिखर-शिंगणापुर यांचे मार्गदर्शनामध्ये अतिशय सुरेख झाला. कार्यक्रमात महिला भजनी मंडळ, रुद्र मंडळ व समाज बंधु भगिनींनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमांमध्ये महाराजांचे पाद्यपूजन संग्रामनगर ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती व श्री. भीमाशंकर वैद्य या उभयतांच्या हस्ते झाला.



           तसेच सौ. विजयालक्ष्मी व सचिन गुळवे यांच्या हस्ते मंदिरा मधील शिवलिंगावर अभिषेक पार पडला. रुद्रपठणाच्या कार्यक्रमानंतर शिंगणापूरकर महाराज यांचे आशीर्वचन पार पडले. आशीर्वाचनामध्ये महाराजांनी ऊँ नम: शिवाय जप व समाजातील सर्व भक्तांना रुद्र पठणाचे महत्त्व सांगून समाज प्रबोधन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सचिन गुळवे, गणेश नरुळे, शिवकुमार गुळवे, आदित्य आर्वे, गणेश उंबरदंड ,बापु वैद्य, सोमनाथ कथले,योगेश गुळवे, संदिप कुंभार, दादा राजमाने, सचिन कथले, अमित कुंभार व महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.



         कार्यक्रमाची प्रस्तावना महादेव पाटील सर यांनी आणि . सुहास सोनवणे सर यांनी आभार प्रदर्शन केले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा