जे रथी ,महारथी ,मराठा नेत्यांना जमलं नाही ते "मनोज जरांगे "यांनी मराठा समाजाचे नेते समाज एकत्र करून लढा यशस्वी केला.
श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार
बी.टी.शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9527 456 958
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या पुर्वी सकल मराठा समाजाचे मोठे नेते समाज संघटित होऊन लाखोंचे मोर्चे काढले पण त्यांना जे जमले नाही किंवा रथी महारथी मराठा नेते यांचे सर्व प्रयत्न कमी पडले त्यांच्या आंदोलनाची धार बोथट झाली पण जिगरबाज व आपल्या भुमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहून आपलं म्हणणं व निर्णय जो पर्यंत शासन प्रत्यक्षात अधिसूचना जारी करत नाही तो पर्यंत अनेकांनी मध्यस्थी शिष्टाई केली हस्ते पर हस्ते त्यांच्यावर वेगवेगळ्या पध्दतीने दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न झाला पण जरांगे पाटील जराही विचलित झाले नाहीत त्यांच्या पोकळ आश्वासनाला शासकीय यंत्रणेला त्यांनी जुमानले नाही त्यामुळे आता पर्यंत ज्या मराठा नेत्यांना जमले नाही ते जरांगे पाटील यांच्या उपोषणाने करून दाखवले आहे त्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत त्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाची तर सहानुभूती आहेच पण ते इतर सर्व जाती धर्माचे लोकांच्या सहानुभूतीस पात्र झाले आहेत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीतरी मनोज जरांगे पाटील यांच्या रुपाने एक खंबीर सक्षम नेतृत्व आहे हे त्यांचे नेतृत्वाने दाखवून दिले आहे अनेक मोठ्या मराठा नेत्यांनी राज्याचे अनेकदा अनेक वर्षे नेतृत्व केले पण ते मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत राजघराण्यातील राजांना जमले नाही पण एक सामान्य कुटुंबातील तरुण आपल्या जिवाची बाजी लावून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठाम राहून शासनाला भाग पाडतो ही आजच्या जमान्यातील अप्रूप वाटावी अशी गोष्ट आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा