Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

सरकार गाफील--- अधिकारी गायब

 सरकार गाफील--- अधिकारी गायब

जनशक्ती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ लवकरच रस्त्यावर उतरणार.


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                 सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, उजनीतून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडा यासह इतर मागण्यासाठी अतुल खूपसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती शेतकरी संघटनेचे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन होते.           



  

 मात्र आंदोलन करण्यापूर्वीच या संदर्भात आपण बैठक लावून असा निरोप आणि विनंतीपोलिसांनी केली. त्यानुसार बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असता एक जिल्हाधिकारी व दोन जबाबदार उपजिल्हाधिकारी नसल्याने सदर बैठक निष्फळ ठरली असून या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्न बाबत सरकार गाफील आणि अधिकारी गायब असल्याचा ठपका ठेवत जनशक्ती संघटना लवकरच ताकदीनिशी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा संस्थापक अतुल खूपसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 





 यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,

 निसर्गाच्या अस्मानी आणि शासनाच्या सुलतानी संकटामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुरता गायकुतील आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून सरकारने अद्याप पाऊल उचलले नाही. सरकारला म्हणावा तसा दुष्काळ पडलेला दिसत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे अधिकारी बेफिकीर तर सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी जनशक्ती संघटना ताकदीनिशी लवकरच रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. 




 संपर्क प्रमुख रेश्मा राऊत, विनिता बर्फे, शर्मिला नलवडे, गणेश वायभासे, बिभीषण शिरसट, विठ्ठल मस्के, केशव लोखंडे, विशाल पाटसकर, भारती पाटसकर, वैष्णवी गावडे, निखिल नागणे, रुक्मिणी शिंदे, दिलीप लोंढे, उर्मिला कोळी, रेश्मा दिवे, श्रावणी दिवे, वैशाली गावडे, कांचन हारवाडकर ,समाधान देवकुळे, महावीर लोंढे, कैलास लोंढे, विष्णु कांबळे, गोरख देवकुळे, भारत शेंडे, अविनाश कदम आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा