अकलुज -----प्रतिनिधी
शकूर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयामध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विद्यालयातील केतकी गाजरे व सानिया तांबोळी यांची भाषणे झाली. हिंदी विभाग प्रमुख शिवाजी थिटे यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय घंटे यांनी सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी स्टेजवरती उपप्राचार्य संजय शिंदे,विनायक रणवरे,पर्यवेक्षक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
जाकीर सय्यद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर पोपट निंबाळकर यांनी आभार मानले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा