अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे बी.एस्सीनंतर करिअरच्या संधी या विषयावर संशोधक विद्यार्थी आकाश जमदाडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते.
यावेळी जमदाडे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की,योग्य परिश्रम घेतल्यास ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थीही संशोधनामध्ये करिअर घडवू शकतो.विद्यार्थ्यांनी नामांकित संस्थांमध्ये शिक्षण व संशोधन करावे.त्यावेळी संशोधन क्षेत्रातील वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची माहिती त्यांनी दिली.
आकाश जमदाडे हे शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून सध्या ते भारतीय विज्ञान,शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे येथे संशोधन करीत आहेत.
यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी वाचन संस्कृती जपण्याचे व संशोधनाच्या माध्यमातून स्वतःचा तसेच देशाचा विकास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या
या सदर कार्यक्रमासाठी मराठी विभागाचे डॉ.जनार्दन परकाळे,डॉ.दमयंती कांबळे, प्रा.उत्तम वाघमोडे,प्रा.स्नेहल पिसे,उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उदयसिंह माने देशमुख,उदयसिंह जाधव, किरण काळे,बी.एस्सी भाग-३ मधील सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ऋतुजा ससाने व कु.सिद्धी मगर यांनी केले.कु.प्रतीक्षा निंबाळकर हिने आभार प्रदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा