सराटी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अजित दादा विचार मंचाच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल- 8378081147
सध्याच्या धकाधकीच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून दिल्याने कुटुंबावरील आर्थिक भार हलका होण्यास मदतीची होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे यांनी केले.
सराटी (ता. इंदापूर) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अजित दादा विचार मंचाच्या वतीने स्रिरोग निदान, रक्त, लघवी, मधुमेह, बीपी, डोळे तपासणी, गुडघे दुखी व इतर तपासण्या मोफत करुन औषध उपचार करण्यात आला. एस. व्ही. देसाई हाॅस्पीटल पुणे व आरोग्य विभागाच्या डॅा. सुमित्रा कोकाटे, डॉ. शुभांगी चाळक, ईब्राहिम मकानदार, चिंतामनी गायकवाड यांनी सदर तपासण्या करण्याचे काम केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, युवराज जगदाळे, मोहन काटे, तानाजी मिसाळ, मधुकर गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. सदर शिबीरास सराटी व परीसरातील रूग्ण, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एस. व्ही. देसाई हाॅस्पिटलच्या वतीने डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३५ लोकांना मोतीबींदु निदान करून शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंद करण्यात आली. तर डोळ्यांना नंबरचा चष्मासाठी १५० लोकांचे निदान झाले. तसेच ३०० लोकांना विविध तपासण्या व औषध उपचाराचा लाभ मिळाला. सदर शिबीरास पुणे जिल्हा आरोग्य अधीकारी डॅा हंकारे यांचे सहकार्य लाभले.
चौकट - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अजित दादा विचार मंचाच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर हा उपक्रम स्तुत्य असून यातून सर्वसामान्यांच्या सेवेचा लाभ भविष्यातील कामासाठी होणार असल्याचे कौतुक माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी भ्रमणध्वनीवर आण्णासाहेब कोकाटे यांचे कौतुक केले.
फोटो - सराटी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा