Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

माळीनगर येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

 

अकलूज -----प्रतिनिधी

केदार---लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

मो-9890 095 283

                          दि मॉडेल विविधांगी प्रशाला व जुनियर कॉलेज माळीनगर येथे आयोजित केलेल्या माळशिरस तालुकास्तरीय शालेय १४,१७ व १९ वर्षे मुले व मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. 

      दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित,दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर आणि जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग माळशिरस यांचे संयुक्त विद्यमाने माळीनगर येथे दि.१ व २ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अनिल रासकर यांचे हस्ते व अकलूज बीटचे केंद्रप्रमुख आर.बी.जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी प्रकाश गिरमे,खजिनदार पृथ्वीराज भोंगळे,संचालक दिलीप इनामके,संचालिका ज्योतीताई लांडगे,प्राचार्य प्रकाश चवरे, उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार,पर्यवेक्षक रितेश पांढरे व क्रीडा विभाग प्रमुख रणजीत लोहार,क्रीडा शिक्षक सिद्धेश्वर कोरे,मारुती आदलिंगे,बाळू चव्हाण,रघुनाथ वाघमारे,संजय पवार,जगन्नाथ कोळी,राजेश कांबळे,सचिन वाघमारे,अमोल राऊत,केतन नकाते,शैलेश माने,बाजीगर शेख व स्पर्धा समितीचे सदस्य तसेच माळशिरस तालुक्यातील क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत क्रीडा मार्गदर्शक रितेश पांढरे यांनी तर सूत्रसंचालन रामहरी वायचळ यांनी केले.


या स्पर्धेचा निकाल


 पुढीलप्रमाणे-१४ वर्षे मुले-गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कुल,माळीनगर(विजयी),

सदाशिवराव माने विद्यालय,

अकलूज (उपविजयी), १४ वर्षे मुली-सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज (विजयी),कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय,सदाशिवनगर (उपविजयी);१७ वर्षे मुले-गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कुल,माळीनगर(विजयी),

विष्णुपंत विद्यालय माळशिरस (उपवीजयी),१७ वर्षे मुली-गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कुल,माळीनगर(विजयी),डॉ.बा.ज.दाते प्रशाला, नातेपुते(उपवीजयी);१९ वर्षे मुले- सदाशिवराव माने विद्यालय अकलूज (विजयी), गोपाळराव देवप्रशाला,माळशिरस(उपवीजयी),१९ वर्षे मुली-सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज (विजयी),कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर(उपवीजयी).






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा