शेतकऱ्यांची बिले अदा करा-- अन्यथा गाळप परवाना देणार नाही:- कमलाई व मकाई कारखान्याला साखर आयुक्त ची तंबी
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
गळीत हंगाम पूर्ण होऊन 7 ते 8 महिने झाले तरी करमाळा तालुक्यातील मकाई व कमलाई या दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अद्यापही अदा केली नाहीत, या कारखान्याच्या विरोधात जनशक्ती संघटनेने पुणे येथील साखर संकुल येथे आंदोलन केले. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत गुलकुंडवार यांनी कारखान्याला तंबी देत ऊस बिले अदा करा अन्यथा गळीत हंगामास परवानगी देणार नसल्याचे सांगितले तर येत्या 7 दिवसात आंदोलन शेतकऱ्यांची ५० टक्के रक्कम अदा करून येत्या ३० तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची 100 टक्के बिले आधार करण्यात येतील असे आश्वासन मकाई व कमलाई या दोन कारखान्यांकडून देण्यात आले.
शेतकऱ्यांची बिले मिळत नसल्याने अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती शेतकरी संघटनेने सकाळी सात वाजता साखर संकुल कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु कार्यकर्त्यांनी शांत न राहता गर्दीचा वाढता दबाव पाहता भिक मागो आंदोलन करून साखर आयुक्त कार्यालयाच्या गेटवर ठिय्या मारला.
यावेळी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत गुलकुंडवार यांनी मकाईचे चेअरमन श्री भांडवलकर, कार्यकारी संचालक खाटमोडे
आणि कमलाई चे कार्यालयीन अधीक्षक यांच्यासोबत जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची समारोसमोर बैठक लावली.
या बैठकीत शेतकऱ्यांनी अक्षरशः डोळ्याला पाणी आणून व्यथा मांडली. तेव्हा साखर आयुक्त यांनी कारखानदारांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांचा एक पै देखील ठेवू नका अन्यथा येणाऱ्या गळीत हंगामाची परवानगी मिळणार नाही अशी तंबी दिली.
यावेळी यावर तोडगा काढत आंदोलक शेतकऱ्यांची 50% बिले येत्या सात दिवसात अदा करण्याचे आश्वासन दिले तर सर्वच्या सर्व बिले 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असे कारखानदारांकडून आश्वासित करण्यात आले..
यावेळी विनिता बर्फे,शर्मिला नलवडे,गणेश वायभासे ,राणा वाघमारे,अनिल शेळके,अतुल राऊत,शरद एकाड,बिभीषण शिरसाट, दीपाली डिरे,किशोर शिंदे,अजीज सय्यद साहेबराव इटकर,बालाजी तरंगे,वैभव मस्के,रणजित पवार,हनुमंत कांतोडे,विजय खूपसे,रेश्मा दिवे, श्रावणी दिवे,रुक्मिणी शिंदे,भाऊसाहेब जाधव आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते
###########################
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा