संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
एकनाथ शिंद मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
!! यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !!
उपरोक्त विषयान्वये विनंती की, राज्यातील मराठा समाज हा मोठया प्रमाणात अल्प भुधारक, भुमिहीन, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असुन समाजास आरक्षण मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये औचित्याच्या मुद्याआधारे प्रश्न उपस्थित करुन आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. परंतु सरकारने अद्याप त्याचे उत्तर दिलेले नाही. समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने राज्यभर अनेक आंदोलने, उपोषण इत्यादी मार्गाचा अवलंब करुन आरक्षणाची मागणी केली आहे. अद्यापही आंदोलने चालु आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्टया विचार करता समाजास तात्काळ आरक्षण देणे आवश्यक आहे.
तरी मराठा समाजाचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाचा विचार करता समाजास कायदेशीर टिकणारे आरक्षण देणे बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व समाजास न्याय जावा अशी विनंती आमदार कैलास दादा पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे
आपला नम्र,
(कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा