Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

जिजामाता कन्या प्रशालेत गणपती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

 


अकलूज -----प्रतिनिधी

केदार---लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

मो-9890 095 283

                          जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थींनीच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आज प्रशालेत गणपती मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.अकलूज येथील मूर्ती कलाकार वेदान्त गानबोटे यांने मुलींना गणपती बनविण्याची माहिती व मार्गदर्शन केले.

       अकलूजमध्ये उपक्रमाधारित शिक्षण पद्धती अवलंबिली जाते. वर्षभर विद्यार्थिनींनी आत्मसात करावयाच्या कौशल्यांच्या नियोजनाची पुस्तिका विद्यार्थिनीकडे असते.त्यानुसार आज गणपती बनविणे विषयीची कार्यशाळा प्रशालेत आयोजित करण्यात आली होती.वेदांत गानबोटे यांनी शाडूची माती वापरून गणपती कसे बनवावेत याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनी समवेत करून दाखवले.या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या व त्यांनीही शाडूची माती वापरून अनेक उत्तम उत्तम गणेश मूर्ती तयार केल्या.या यशस्वी उपक्रमासाठी प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ माधुरी भांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.      



            या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेची झाली.याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता वाघ पर्यवेक्षक यशवंतराव माने-देशमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.         


        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री कणबूर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ.माधुरी भांगे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा