Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

होऊ द्या चर्चा

 शहापूर जि, प, गटातील- ईटकळ ता. तुळजापूर येथे " होऊ द्या चर्चा" "करू या योजनांचा भांडाफोड" या अभियानाची बैठक संपन्न


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                   भारतीय जनता पार्टी प्रणित मोदी सरकारने महागाईचा आगडोंब उसळवून ठेवला आहे. मागील नऊ वर्षांमध्ये केंद्र शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्याला व सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांच्या बाबतीत किती घोषणा केल्या व त्यापैकी किती दिल्या.



यामध्ये सगळ्या स्थानिक तसेच देशपातळीवरील विविध शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या मागणीच्या चर्चा आपल्या गावातील वाडी, वस्ती, मंदिरात, पारावर करून केंद्र सरकार व मोदी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला काय दिले याची चर्चा करावी व मतदार बोलता करावा यासंदर्भात चर्चा झाली.



याप्रसंगी संपर्कप्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या समवेत जगन्नाथ गवळी धाराशिव चे माजी नगरसेवक प्रदीप घोणे, माजी जि.प. सदस्य राजअहमद पठाण, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, संजय भोसले, मुरली शिनगारे, येवती सरपंच अमोल गवळी, चनप्पा साखरे, विकास सुरवसे, आप्पा जमादार आदींसह शहापूर जि.प. गटातील सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा