इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. भाग्यश्री सुदर्शन बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ ज्योती श्रीकांत बोडके होत्या. निवडणुकीची प्रक्रिया नायब तहसीलदार एस. बी. माने व ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी पार पाडली.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ ज्योती श्रीकांत बोडके यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान सरपंच सौ ज्योती श्रीकांत बोडके यांनी भुषविले. यावेळी झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सौ. भाग्यश्री सुदर्शन बोडके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच पांडूदादा बोडके, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, अनुराधा गायकवाड, सुनिता शेंडगे यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला.
सदर निवडी प्रसंगी माजी सरपंच श्रीकांत बोडके, बबन बोडके, अशोक बोडके, नामदेव बोडके, वर्धमान बोडके, सुदर्शन बोडके, बाळासाहेब घाडगे, हरीभाऊ सुतार, रमेश मगर, सोमनाथ बोडके, शहाजी बोडके, समाधान मगर, बालाजी बोडके, नबीलाल शेख, सतीश बोडके, राजेंद्र लावंड, केशव बोडके, आप्पासाहेब सुतार, मारुती सुतार, भाऊ रणदिवे, शंकर रणदिवे, प्रशांत चौघुले आदि मान्यवर उपस्थित होते.
सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर बोलताना भाग्यश्री बोडके म्हणाल्या पिंपरी बुद्रुकच्या ग्रामस्थ व जनतेच्या पाठिंब्यामुळेच मी आज सरपंच झाले. यापुढे आमदार दत्तात्रय मामा भरणे व माजी सरपंच श्रीकांत बोडके, सुदर्शन बोडके व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी गावचा चौफेर विकास करायचा आहे. सर्वसामान्य गोरगरीब मायबाप जनतेचा विसर कधीही पडू देणार नाही, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावचा चौफेर विकास करणार आहे.
यावेळी उमराह हज यात्रेसाठी निघालेल्या सौ नफिसा नबीलाल शेख यांचा ग्रामस्थांच्या वतीने नुतन सरपंच भाग्यश्री बोडके व माजी सरपंच ज्योती बोडके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व हार देवून सन्मान करण्यात आला.
चौकट - मागील ५१ वर्षांपूर्वी याच बोडके कुटुंबातील माजी सरपंच कै. नारायण ईश्वरा बोडके यांनी १९६९ ते ७३ साली गावची लोकसंख्या कमी असताना पाच वर्षाच्या कालावधीत सात गावाची ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांच्या कुटुंबातील सोसायटीचे माजी चेअरमन सुदर्शन रघुनाथ बोडके यांच्या पत्नी भाग्यश्री सुदर्शन बोडके यांना सरपंच होण्याचा मान मिळाला आहे.
फोटो - पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. भाग्यश्री सुदर्शन बोडके यांची बिनविरोध निवड.
---------------------------








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा