Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

शिक्षकांनी गरिबांच्या मुलांचे आई - बाबा होऊन त्यांना मदत केल्यास

 शिक्षकांनी गरिबांच्या मुलांचे आई - बाबा होऊन त्यांना मदत केल्यास ती मुले आयुष्यभर शिक्षकांना विसरणार नाहीत : प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांचे भावोद्गार


प्रा.विश्वनाथ पाटील

कोडोली---प्रतिनिधी

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो.9975 978 073

                   " शिक्षकांनी गरिबांच्या मुलांचे आई - बाबा होऊन त्यांना घडवावे. त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत करावी. ती मोठी झाल्यावर तुमची ओळख ठेवतील. तीच तुमच्या शैक्षणिक कार्याची पोहोचपावती ठरेल," असे भावोद्गार येथील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी शिक्षक दिनाच्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.



      प्रारंभी डॉ. गोडबोले व डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सरस्वतीदेवीच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली. विद्यार्थी - शिक्षकांनी गुरुजनांचा वृक्षांची रोपे देऊन सत्कार केला.


     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले, " आजच्या शिक्षणव्यवस्थेत यांत्रिकपणा आला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रेम देखील यांत्रिक झाले आहे. माणुसकी हरवत चालली असून ती मोबाईलच्या मेसेजमध्ये बांधली गेली आहे. प्रत्यक्ष संवादापेक्षा यांत्रिक संवादाला महत्त्व प्राप्त झाले असून ही बाब गंभीर आहे. या व्यवस्थेत बदल होणे आवश्यक आहे. "


   यावेळी ऐश्वर्या पोतदार, अमित कांदळकर आणि उषा रवींद्र पाटील यांची डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारी भाषणे झाली.


         पद्मश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेघा दाइंगडे यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्निल सुतार यांनी आभार मानले. याप्रसंगी सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका श्रीमती गुलनास मुजावर आणि प्रा. संजय जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.

///////////////////////////////////////////////////



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा