Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

"पांगरी" ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर खाजगी हॉस्पिटल चालवतात आणि मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची गैरसोय-- जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स - 45 -न्युज मराठी

मो.9730 867 448

                       आज दिनांक सप्टेबर २०२३ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर पांगरी ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टर मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची गैरसोय थांबवण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.सदर बजार पोलीस सोलापुर यांच्या मध्यस्थीने चर्चा करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात बैठक देखील लावण्यात आली,महाराष्ट्रातील सर्व सरकारी दवाखान्यात रुग्णास पूर्ण वेळ डॉक्टर,निवासी डॉक्टरची तरतूद आहे.आरोग्य विभागाच्या नियमावली प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पांगरी ग्रामीण रुग्णालय तालुका बार्शी अंतर्गत डॉक्टर विरेंद्र गवळी (एम एस) हे मुख्यालय येथे राहत नसल्याचे दिसून आले आहे.ग्रामीण भाग व रहदारीचे ठिकाण असल्याने पांगरीमध्ये अपघात,महिलांच्या प्रसूती,साथीचे रोग,विविध वैद्यकीय सेवा यामुळे डॉक्टरांनी दवाखान्यात राहण्याची तरतूद असताना देखील ते राहत नाहीत.तसेच धाराशिव येथील खाजगी चिरायू हॉस्पिटल,रामनगर येथे खाजगी डाॅक्टर प्रॅक्टिस करत असल्याचे निदर्शनास आले आहे.सरकारी डॉक्टर असून खाजगी प्रॅक्टिस करतात.हे बेकायेशीररित्या हॉस्पिटल धरशिव येथे चालवतात.तसेच मुख्यालयी राहत नाहीत,म्हणुन त्यांच्यावर समिती स्थापन करण्यात आली आहे.अहवाल आल्यानंतर डॉ विरेंद्र गवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल,असे जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांचे प्रतिनिधी म्हणून कुलकर्णी,लोमटे उपस्थित राहून चर्चा केली आणि 10 आँक्टोबर पर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.तर जनशक्ती शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख रेश्मा राऊत,बिभीषण सिरसाट,अभिजित चवरे,विठ्ठल आबा मस्के,दिलीप आप्पा लोंढे,उर्मिला कोळी,श्रावणी दिवे,रेश्मा दिवे,राजू कणसे आदी उपस्थित होते. 




यावेळी ग्रामीण भागातील शेवरे,टेंभुर्णे,

कुर्डूवाडी,करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार,सेवे बद्दलच्या तक्रारीवर देखील चर्चा करण्यात आली.




















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा