Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

शंकरराव मोहिते महाविद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न

 


अकलुज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                        अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्य प्रसिद्धी सप्ताहा अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.हनुमंत अवताडे हे होते. 

      आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.अवताडे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत सजग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,या प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिरांमधून विद्यार्थ्यांच्या रक्तातील घटक तपासले जातात व त्यावरून विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्यांची सोडवणूक करणे शक्य होते .                   


             अकलूज उपजिल्हा रुग्णालयातील तांत्रिक सहाय्यक सुंदर गायकवाड तसेच त्यांचे सहकारी अजय जाधव व निकीता पवार यांनी या शिबिरात आरोग्य तपासणीचे काम केले.सुंदर गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की,अलीकडच्या काळात विविध आजारांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत तथापि आरोग्य तपासण्यांच्या माध्यमातून युवक युवतींच्या आजारांचे निदान करणे शक्य होते.या शिबिरात ९० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.         

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.सज्जन पवार यांनी केले.अजय नाईकनवरे याने सूत्रसंचालन केले ,तर आभार अल्केश गेजगे याने मानले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सज्जन पवार,प्रा.स्मिता पाटील कार्यालयीनअधीक्षक युवराज मालुसरे यांच्यासह सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा