शिक्षक दिनानिमित्त कै.नारायण त्रिंबक कोरांटक गुरूजी स्मृती आदर्श पुरस्कार" गुणवंत शिक्षकांना देवून सन्मान
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल- 8378081147
नीरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व श्री.सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात "शिक्षक दिन" कै.नारायण त्रिंबक कोरांटक गुरूजी स्मृती आदर्श पुरस्कार" गुणवंत शिक्षकांना देऊन सन्मानीत करण्यात आले. नरसिंहपूर पंचक्रोशीतील जिप प्राथमिक शाळा व चैतन्य विद्यालय व श्री.सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविदयालयातील गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये नरसिंहपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देशमुख गुरूजी, संगम जिप प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय भोसले गुरूजी, शेवरे जिप प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब राजगिरे गुरूजी व सुधाकर गोंविद दंडवते कनिष्ठ महाविद्यालयाचे आदर्श प्रा. हनुमंत पराडे सर यांना आदर्श व गुणवंत शिक्षक म्हणून गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्यवाह श्रीकांत दंडवते, कार्याध्यक्ष अभय वांकर, खजिनदार मगनदास क्षीरसागर, कार्यकारणी सदस्य सौ.भाग्यश्री(वीणा) दंडवते यांचे हस्ते गुणवंत शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले. मागील 27 वर्षे संस्थेचे माजी कार्यवाह गजानन नारायण कोरांटक गुरूजी हे वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत शिक्षकांना शाल, पुष्पहार, श्रीफळ, मोठी ट्राॅफी, सर्टिफिकेट देऊन सन्मान करतात.
याप्रसंगी चैतन्य विद्यालय व श्री.सु.गो. दंडवते कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तरांचा गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी सन्मान केला. तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने "टीचरर्स डे" साजरा करण्यात आला. यावेळी सत्कारमुर्ती राजगिरे गुरूजी, विजय भोसले गुरूजी, हनुमंत पराडे सर यांनी शिक्षक दिनाचे महत्व व चांगले विचार मांडले. विद्यार्थ्यी शिक्षक आदित्य रानमाळ, विद्यार्थी मुख्याध्यापक कु.राधिका रानमाळ, कु.प्रगती जाधव या वक्त्यांनी डाॅ.राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक व तत्वज्ञान राष्ट्रपती कार्य या विषयी माहीती सांगीतली. माजी मुख्याध्यापक धनंजय दुनाखे सर यांनी ज्यांचे नांवे हा पुरस्कार दिला जातो ते कै.नारायण त्रिंबक कोरांटक गुरूजी यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा व तत्कालीन गुरूजनांचा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना घडवण्यात मोठा वाटा आहे. याप्रसंगी वैदेही दंडवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात कार्यवाह श्रीकांत दंडवते यांनी पुरस्काराचे स्वरूप यावर्षी कशा पध्दतीने बदल करून गुणवंत शिक्षक निवडले यांची माहीती दिली. पुढच्या वर्षी अकरा आदर्श व गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव पुरस्कार देऊन करणार आहे.
याप्रसंगी सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी अध्यात्म गुरूकुल मंडळाचे डाॅ.अरूण वैद्य, प्रगतीशील बागायतदार किशोर मोहीते, सकाळचे पत्रकार शौकत तांबोळी, शि.प्र.मंडळ सदस्य अमोल कोरांटक, शामराज (प्रमोद ) दंडवते, कार्याध्यक्ष अभय वांकर पाटील, खजिनदार मगनदास क्षीरसागर, कार्यकारणी सदस्या सौ.भाग्यश्री दंडवते, सौ.वैदेही दंडवते, पालक वर्ग, प्राचार्य गोरख लोखंडे, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यार्थींनी कु.गौरी महाडीक यांनी केले तर सुत्रसंचालन कु.गौरी महाडिक व कु.साक्षी धुमाळ या विद्यार्थींनी केले. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन सुत्रसंचालन व आभार श्री.लावंड सर यांनी मानले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा