Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

सद्गुरुची संगत गरजेची आहे---

 भगवान शिवाची आराधना करा---- कोळेकर महास्वामीजी

सद्गुरुची संगत गरजेची आहे---

वाईकर महास्वामीजी


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                      माता लक्ष्मी व विष्णूंनी 'भगवान शिवाची आराधना करून एक लक्ष बेल, कमळ, शिवास वाहिले परंतु यामध्ये एक कमी पडले त्यावेळी स्वतःचे स्तन अर्पण करून संकल्प पूर्ण करा याप्रमाणे सर्व वीरशैव बांधवांनी लिंग पूजा करून शिवाची आराधना करा व शंकर पार्वतीच्या" दिव्य तुला" चा इतिहास सांगितला व प्रत्येकाने अहंकार गर्व नष्ट करण्यासाठी गुरु तुला करणे गरजेचे आहे व सर्व शिवभक्तांना धनसंपत्ती व जीवनात आनंद मिळण्यासाठी शिवाजी आराधना गरजेचे आहे असे गुरुनिर्वाणु रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांनी भव्य दिव्य गुरू तुला कार्यक्रमात महादेव मंदिर, अकलूज येथे आशीर्वाचनात सांगितले


शिव निर्णय संघटना, वीरशैव सभा ,वीरशैव भजनी मंडळ व समस्त वीरशैव लिंगायत समाज, अकलूज या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही दोन्ही महास्वामी चा भव्य दिव्य तुला कार्यक्रम करू शकलो व यापुढेही सर्वांनी सहकार्य करावे असे मत- उत्कर्ष शेटे यांनी यावेळी व्यक्त

 केले प्रारंभी समृद्धी गुळवे ऐश्वर्या गुळवे, श्रेयस उबाळे ,राजेंद्र चिंचकर, रामचंद्र चिंचकर, ज्ञानेश्वर गाढवे ,विस्ताराधिकारी सावळजकर व पत्रकार रविराज शेटे सर या गुणवंतांचा सत्कार दोन्ही महास्वामींच्या हस्ते करण्यात आला तसेच अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम गुरु करतात व त्यांचे महत्त्व फार मोठे आहे व जीवनाचा खरा मार्ग दाखविणारा गुरुच असतो त्यामुळे गुरु विषयी श्रद्धा ठेवा व आम्ही वीरशैव यांचा आम्हास अभिमान आहे असे प्रा. प्रशांत सरूडकर यांनी यावेळी सांगितले


मानवी जीवनात गुरुची संगत गरजेची आहे कारण गुरु अज्ञान नाहीसे करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात व आई वडील यांचे जीवनात फार मोठे महत्त्व आहे त्यांची सेवा करा व आई वडील गेले तर जीवनाचा सार संपला याबद्दल आई विषयी प्रेम गीत गायले



चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई गं, येना माझे आई ग तू येना माझे आई ग, या गीतावरून करण्यात आली. उपस्थित महिला व पुरुष वर्गाचे डोळे पाणावले तसेच आज एक नव्हे दोन दोन शिवाचार्य श्रावण मासात आणून त्यांची भस्म व गुळाने दिव्य तुला करण्याचा सहयोग उत्कर्ष शेटे व सर्व अकलूज वीरशैव बांधवांनी आणला व सर्व शिवभक्तांना जीवनात आनंद प्राप्त होवो व सद्गुरु एक नव्हे तर तीन सद्रुरूंचा आशीर्वाद तुम्हास प्राप्त झाला असे शिवाचार्य वाईकर महास्वामीजी यांनी आशीर्वाचनात



सदर प्रसंगी कोळेकर महास्वामीजी पाद्यपूजा शिवभक्त संजय धोत्रे व सुजाता धोत्रे शेटे यांच्या शुभहस्ते तर वाईकर महास्वामी ची शिवभक्त स्वप्नील कोरे व सौभाग्य श्री कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी दोन्ही शिवाचार्य यांच्या दिव्य गुरु तुलेस मा सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते विभूती व गुळ अर्पण करून



यावेळी शिवभक्त चंद्रकांत कुंभार, किसन नरुळे, उमेश शेटे, भिंगे गुरुजी ,दत्तात्रय भिंगे ,नितीन आर्वे ,राजू आर्वे ,चंद्रकांत शेटे, आप्पा दिवटे ,रामचंद्र चिंचकर, सुनील दळवी, चंद्रकांत नरळे, अतुल शेटे, विलास क्षीरसागर, संतोष देवशेटे ,गिरीश शेटे, उमेश नडगिरे ,अशोक शेटे' गणेश नरुळे, उमेश गुळवे, सुनील कोरे, जगदीश स्वामी, प्रज्ञा जठार, राजश्री गुळवे , श्वेता गुळवे ,प्रशांत चिंचकर, महादेव पाटील ,बाळासो गवसने ,सुहास उरवणे, रामलिंग हांडे ,राजेंद्र शेंडे ,महिला वीरशैव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा. सुहास उरवणे तर सर्वांचे आभार शिवभक्त मंगेश नाना शेटे यांनी मानले.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा