Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

कराटे क्रीडा प्रकारामुळे विद्यार्थी स्वसंरक्षक बनतात ------खासदार ओमप्रकाश निंबाळकर.

 


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                           तुळजापूर - शालेय जीवनातील खेळ मुलांना शारिरीक तंदुरुस्ती आणि बौद्धिक सक्षम बनवतात,कराटे खेळ प्रकार वैयक्तिक स्वसंरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना विविध क्रीडाप्रकाराकडे वळवले पाहिजे असे मत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राज्यस्तरीय कराटे अजिंक्य पद क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.



धाराशिव जिल्हा तेंग सु डो कराटे असोसिएशन तर्फे तुळजापूर येथे दहावी राज्यस्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिव खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, श्री तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजी बुवा, महंत ईच्छागिरी गुरू महादेव गिरी, महंत मावजीनाथ बुवा,महंत व्यंकट अरण्य महाराज, स्पर्धेच्या मुख्य आयोजक शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे पवार, तेंग सु डो स्पोर्टस् फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मास्टर रॉकी डिसुझा, महासचिव मास्टर सुभाष मोहिते,जिल्हा अध्यक्ष मास्टर महमदरफी शेख आदीसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले   



शहरातील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे ( दि.१५) ते( दि.१७) सप्टेंबर दरम्यान या स्पर्धचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेला २४ जिल्ह्यातील क्रिडाविद्यार्थी व क्रीडापालकांनी उत्सुकतेने सहभागी झाले आहेत.



याप्रसंगी याप्रसंगी शाम पवार, सुनिल जाधव, डाॅ सतिश महामुनी, संजय भोसले,प्रतीक रोचकरी, लखन कदम,दुळाप्पा रक्षे,प्रेम कदम, सुरेखा मुळे, शोभा शिंदे,बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या दि. १७ सप्टेंबर रोजी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा