Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सोमवारी २५ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुका दौऱ्यावर

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी, 

मोबाईल-8378081147

                         : बारामती लोकसभेच्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सोमवारी २५ सप्टेंबर २०२३ रोजी इंदापूर तालुका दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी दिली.

    खासदार सुप्रिया सुळे दुपारी २ वाजता भिगवन, तक्रारवाडी, मदनवाडी गणपती मंडळांस भेटी देणार आहेत. त्यानंतर ३ वा ३० मि कार्यकर्ता संवाद बैठक स्थळ सोनाई पॅलेस इंदापूर, सायंकाळी ५. वाजता सरस्वतीनगर इंदापूर शहर येथून श्री गणेश आरत्या व इंदापूर शहरातील श्री गणेश मंडळांना भेटी देणार आहेत अशी माहिती सागर मिसाळ यांनी दिली. तर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सागर मिसाळ व छायाताई पडळकर यांनी केले आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा