Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

अकलूज येथे "हेस वेल्फेअर फाउंडेशन "ची पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक संपन्न

 


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                         हेस वेल्फेअर फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक अकलूज येथे संपूर्ण झाली ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष एल एस बेदी यांच्या मार्गदर्शनानुसार , राष्ट्रीय सरचिटणीस अझर पटेल, राष्ट्रीय प्रचार सचिव बापूसाहेब ढगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 8 /9 /2023 रोजी अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम महाराष्ट्र विभाग सोलापूर , सांगली, कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी यांची आढावा बैठक तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला .



या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून झहीर पटेल उपस्थितीत होते. .यावेळी बापुराव ढगे पाटील यांनी उपस्थितांना हेस वेल्फेअर फाउंडेशन कार्या विषयी सविस्तर माहिती दिली.मानवाधिकार, नशीला पदार्थ विरोधी, भ्रष्टाचार व पर्यावरण या चार गोष्टी मिळुन हेस वेल्फेअर फाउंडेशन या निती आयोग भारत सरकारच्या माध्यमातून काम करत आहेत 



त्यामुळे आपले संघटन कौशल्य मजबूत करण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली 

सोलापूर जिल्हाचे जिल्हाध्यक्ष .विलासनंद विठ्ठल गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा .शशिकला खसपटे, जिल्हा कार्याध्यक्ष आप्पासाहेब व्हनमाने, जिल्हा युवक अध्यक्ष श्रीनिवास पवार , राजीव गायकवाड, विभागीय अध्यक्ष , मार्था असादे, सोलापूर जिल्हा सचिवर- शोभा गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष , अरुणा राठोड, तालुका अध्यक्ष सोलापूर, आदिनाथ मोहन जाधव, माळशिरस तालुका अध्यक्ष, प्रकाश बनकर ,तालुका कार्याध्यक्ष, --पिंटू भोसले ,सुजाता गोखले सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख -छाया वायदंडे माळशिरस तालुका अध्यक्ष - ,मधुकर कांबळे मंगळवेढा तालुका अध्यक्ष ,सांगली जिल्हा अध्यक्ष अवलीशाह पटेल,. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष- मकबूल खान, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष खाजा मालदार, कोल्हापूर शहर अध्यक्ष अकबर बागवान यांची निवड झाल्याबद्दल हेस वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

या प्रसंगी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सत्कार हेस वेल्फेअर फाउंडेशन चे राष्ट्रीय प्रचारक- बापूराव ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात 



 आदिनाथ जाधव सर यांनी हेस वेल्फेअर फाउंडेशनचे वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडे दिलेल्या निवेदनानुसार अकलूज नगर परिषद मुख्याधिकारी अकलूज यांनी.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशाची दखल घेऊन सिटी सर्वे नंबर 987 /61मधील अनधिकृत लोकांचे येणारे अतिक्रमण काढून टाकणे कामे 26 /8/ 2023 रोजी रजिस्टर पोस्टाने अतिक्रमणधारकांना नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहेत. तसेच तहसीलदार(.माळशिरस) यांनी सुद्धा आम्हाला अनधिकृत अतिक्रमण धारकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे परंतु अद्याप पर्यंत नोटीस बजावण्यात आली नाही याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी याचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला आज पर्यंत साठ वर्षाचा प्रश्न कोणी सोडवला नाही तो हेस वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय प्रचारक बापूसाहेब ढगे पाटील यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमची अनधिकृत अतिक्रमणधारकांची कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हेस वेल्फेअर फाउंडेशन शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले शेवटी

जिल्हाध्यक्ष विलासनंद गायकवाड यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी यांचे आभार मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा