अकलुज -----प्रतिनिधी
शकूर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे हिंदी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .
हिंदी भाषा ही संपूर्ण भारत देशाला एकतेने जोडणारी भाषा असून दैनंदिन व्यवहारात हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असे विचार प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन काकडे मॅनेजर ,बँक ऑफ इंडिया अकलूज , प्रमुख व्याख्याते जाकीर सय्यद, प्राध्यापक समावि अकलूज यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील व हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमांचे पूजन केले.
हिंदी दिनानिमित्त प्रशालेत हिंदी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. हिंदी वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त भूमिका कारमकर, श्रीजा पतकी,प्रांजल जाधव यांनी आपले विचार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
प्रमूख व्याख्याते जाकीर सय्यद यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषेचे महत्व व मुन्शी प्रेमचंद यांचे हिंदी भाषेविषयी असणारे योगदान विशद केले.
अध्यक्ष नितीन काकडे मॅनेजर बँक ऑफ इंडिया यांनी विद्यार्थ्यांना बँक व्यवहार तसेच बँकेची विविध खाती याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक भारत चंदनकर पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे ,शिवाजी थोरात, भाग्यश्री गुजरे हे उपस्थित होते.
नागेश सोनवणे यांनी आभार मानले सुवर्णा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिभीषण जाधव, किरण सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. सारे जहासे अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा