इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस.बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
: 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात परीसरात दहा दिवसापासून सुरू असणाऱ्या आनंदोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी दिवसभर घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तर सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सवांचा सांगता सोहळा पार पडला. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होत गणरायाला निरोप दिला. हलगी लेझीमाच्या तालावर गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप देण्यात आला.
यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी दुष्काळी छायेत आहेत. तर येथून वाहणारी नीरा व भिमा नद्या गणपती बसते वेळी कोरड्या ठणठणीत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या समोर गणपतींचे विसर्जन कोठे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मागील पाच दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीने नीरा नदी वाहू लागली. तर भिमेला पाणी सोडण्यात आले होते. यामुळे विसर्जनाच्या निमित्ताने नीरा व भिमा नदी काठावर भक्तीमय वातावरण व गणेशभक्तांचा जयघोषाने वातावरण दुमदुमल्याचे पहावयास मिळाले.
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी व सर्वांना याचा आनंद घेता यावा यासाठी गणेश भक्तांनी चोख नियोजन केले होते. विसर्जन मिरवणूक सोहळ्यातील अनेक मंडळाचे कार्यकतें एकत्र येऊन गोंधळ उडू नये यादृष्टीने गावांमध्ये प्रत्येक मंडळांनी आपापले विसर्जन मिरवणुकीचे मार्ग वेगवेगळे ठेवले होते. तर वाडी वस्तीवरील मंडळांनी विसर्जनाच्या वेळा बदलल्याने सर्वत्र शांततेत विसर्जन सोहळा पार पडला.
बावडा दुरक्षेत्र पोलीसांनी गावोगावी जाऊन प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटून मिरवणूक, डिजे तसेच मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांची उधळण करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी केले. यावेळी हवालदार जगन्नाथ कळसाईत, जाधव आदि उपस्थित होते.
फोटो - गणेशवाडी येथील भिमा नदीवरील पुलावर गणरायाची आरती करून विसर्जन करण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा