अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. कुटुंबातील महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब व पर्यायाने गाव आणि देश निरोगी आणि सदृढ बनेल.त्यामुळे महिलांमध्ये आरोग्य आणि आहाराविषयी जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अकलूज बीट-शंकरनगर (१) व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांचे संयुक्त विद्यमाने शंकर नगर येथे "पोषण महा"उपक्रमाद्वारे महिलांमध्ये आरोग्य व आहारविषयक विविध प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती करण्यात आली.
शंकरनगर येथील पार्वती अंगणवाडी येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये घरगुती नैसर्गिक खाद्यपदार्थ,फळे यामधून मिळणारे सहज व अमूल्य पोषण आणि त्यातून किशोरी,गरोदर, स्तनदा माता व बालकांना होणारा फायदा आणि महत्व समजावून सांगण्यात आले.तसेच गरजचे असलेली जीवनसत्वे मिळण्यासाठी विविध फळे, पालेभाज्या,कडधान्य तांदूळ सर्व डाळी,मासे,दूध यांचे महत्त्व "पोषण परी" या जिवंत देखाव्याद्वारे विशद केले.योग्य आहार आणि निरोगी आरोग्यासाठी महिलांनी स्वतःपासून सुरुवात केली तरच देशांमध्ये "आरोग्य क्रांती "होऊन निरोगी भारत निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महिलांनी निरोगी देश घडवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचेचआवाहन करण्यात आले.
शंकरनगर ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा सरतापे यांनी मुलांबरोबर मातांनीही पोषण आहाराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.त्याच बरोबर मातांनी आपल्या आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला सरपंच वर्षा सरतापे यांनी उपस्थित मातांना आणि महिलांना दिला.
डॉ. प्रियंका काळे यांनी महिलांमध्ये बारा ते अठरा वयोगट अत्यंत महत्त्वाचा आहे. या वयोगटांमध्ये आहाराला अनन्य साधारण महत्व असून आहार चांगला असेल तरच शारीरिक वाढ चांगली होते. त्यासाठी "ब" जीवनसत्व युक्त आहार घेणे गरजेचे असल्याने सांगितले.
अंगणवाडी शंकरनगर बीट (१) च्या पर्यवेक्षिका रितू चव्हाण यांनी आपल्या प्रस्ताविकात आरोग्य आहार आणि पोषण यांचा सुरेख त्रिवेणी संगम साधत त्यातून होणारे फायदे सांगितले.त्या म्हणाल्या १९८२ मध्ये अमेरिकेत पोषण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. २०१८ साली पोषण महाची सुरुवात झाली.सध्या 34% एवढी संख्या घोषित नागरिकांची आहे.त्यामुळे आहार आणि पोषण याविषयी जनजागृती महत्त्वाची आहे. पोषण महा उपक्रमातून नैसर्गिक आहारातून बरीच पोषण मिळू शकते हा संदेश महत्त्वाचा आहे. गरोदर मातांसाठी सुरुवातीचे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणून "आहार बदला आणि सुदृढ बालक जन्माला घाला" असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
रोटरीच्या अमोलिका जामदार यांनी भाज्यांची महत्त्व सांगून कुटुंबातील महिला निरोगी असेल तर कुटुंब सुदृढ बनून शकते असे सांगून सर्व महिला आणि बालकांचे मोफत शारीरिक तपासणीचे आश्वासन दिले. यावेळी समर्थ सुनील पिसे,अक्षर आकाश गुंड,कु.इनायक नवाज पठाण या सदृढ बालकासह त्यांच्या मातांचा सन्मान करण्यात आला .
सदर प्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लबच्या मानसी कदम, संयुक्ता जोशी,मेघा जामदार,स्वाती चंकेश्वरा आदी उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका जयश्री गिरमे,सारिका ननवरे,प्रतीक्षा सावंत,मंगल भंडारे,अर्चना फुले,अनिता दोरकर यांचे सह शंकरनगर येथील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका उज्वला लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन स्वाती पोतदार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा