संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
लुमेवाडी ता.इंदापूर जि. पुणे येथील गाजी- ए -मिल्लत सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी (र.अ) यांच्या 30 व्या उरूस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आवाटी येथील सुफी संत हजरत वली चांँद पाशा साहब ,सुफी संत आरिफ बाबा -अंबाजोगाई ,तसेच सूफी संत हजरत याद अली साहब( छोटे बाबजी) राजस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली खालील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे
यावर्षी उरुस निमित्त शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9 वाजता लुमेवाडी येथे संदल चा कार्यक्रम होणार असून या संदल च्या मिरवणुकीस अकलूज येथील काझी गल्लीतून प्रारंभ होऊन सालाबाद प्रमाणे ही मिरवणूक संपूर्ण अकलूज शहरात भ्रमण करत लुमेवाडी येथे गेल्यानंतर अकलूज, लुमेवाडी व सोलापूर पुणे सांगली सातारा इत्यादी जिल्ह्यातून आलेले संदल सुफी संत फतेह मोहम्मद जोधपूरी यांच्या मजार वर (समाधी )चढवला जाणार आहे त्यानंतर लुमेवाडी येथे प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे
? शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी उरूस निमित्त दिवसभर येणाऱ्या भाविकांसाठी लुमेवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे रात्री 7 वाजता सुप्रसिद्ध कव्वाल "हाजी मुराद आतिश "(कर्नाटक) यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे
रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7 वाजता "जियारत" चा कार्यक्रम झाल्यानंतर उरुसाची सांगता होणार आहे
या उरुस निमित्त ,विजापूर येथील सादिक भाई उर्फ अद्दी शाह दर्गा यांच्या वतीने डेकोरेशन तर कन्हेर इस्लामपूर येथील आबा सरगर यांच्या वतीने "ऑडिओ लाॕली साउंड सिस्टीम असणार आहे .
तरी सुफी संत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी यांच्या अनुयायानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्ट सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी व मुस्लिम जमात लुमेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा