संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
संग्राम नगर अकलूज येथे जियारत -मुए-मुबारक ( स.अ) व सुफीसंत हाजी हाफीज फतेह मोहम्मद जोधपूरी (र.अ) यांच्या 30 व्या उरुस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,हजरत पिरो मुर्शिद अलहाज ,अब्दुल गणी बेग (बाबजी ) (र.अ) आणि हुजुर सुफी - ए- हिन्द सय्यद मखदुम सुफी अब्दुल्ला इब्राहिम (र.अ) यांच्या पावन आर्शिवादाने तसेच हजरत याद आली साहब (छोटे बाबजी) यांच्या मार्गदर्शनाखाली व सुफी हाजी अब्बासभाई बेग (बाबजी यांचे सुपुञ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या उरूस निमित्त बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता दर्गाह मस्जिद विजय चौक- अकलूज येथून संदलची मिरवणूक निघणार असून ही मिरवणूक संग्रामनगर येथे पोहोचल्यानंतर संदल चा कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी जियारत -मुए-मुबारक म्हणजेच मुए-मुबारक चे (दर्शन) व हाजी हाफीज फतेह मोहम्मद जोधपूरी ( र.अ.) ऊस निमित्त प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे
तसेच महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून अकलूज आणि पंचक्रोशीतील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आशिकाने कमिटी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी संग्राम नगर अकलूज यांच्यावतीने करण्यात आले आहे तसेच या उरूस निमित्त नगरपरिषद अकलूज व ग्रामपंचायत संग्राम नगर यांचे सालाबाद प्रमाणे विशेष सहकार्य लाभणार असल्याचे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा