संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
श्रध्देय मा.आ.कै.. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांच्या संकल्पनेतून व कारखान्याचे चेअरमन . आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना दरवर्षी कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक साखर उताऱ्याचा व अधिक ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकन्यास "पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार" व "पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर करित असतो.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखाना लि., श्रीपूर यांचे वतीने कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पांडुरंग ऊस भूषण व पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचे स्वरुप पांडुरंग ऊस भूषणसाठी रक्कम रु.100111/- व पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी रक्कम रु.25111/- सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा असे स्वरुप आहे. या पुरस्कारामध्ये विजेत्या शेतकन्यास सपत्निक गौरविण्यात येते.
" 'पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार विजेते शेतकरी
सभासदाचे नांव पुंडलिक पांडुरंग मोरे
गळीत हंगाम -2022-23
गांव-चळे
एकरी उत्पन्न
87.874
ही योजना कारखान्याने मागील पाच हंगामापासून सुरु केलेली असून, या योजनेमध्ये संपुर्ण कारखाना कार्यक्षेत्रातून "पांडुरंग ऊस भूषण' पुरस्कारासाठी सभासदाची निवड केली जाते. त्यासाठी गळीत हंगाम 2022- 23 मध्ये ज्या सभादांनी भाग घेतला होता त्यांचेमधून पुंडलिक पांडुरंग मोरे रा. मुंडेवाडी यांना गळीत हंगाम
2022-23 चा "पांडुरंग ऊस भूषण" हा पुरस्कार जाहीर करणेत आलेला आहे.
" पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते शेतकरी एकरी उत्पन्न
गळीत हंगाम 2022-23
1 ). शकुंतला भगवान रोगे वहाँ
पंढरपूर
2)माणिक हरी भोसले
नारायण. चिंचोली
देगांव
3). रामचंद्र नाथा जाधव
सिध्देवाडी चळे
4). राहुल मच्छिंद्र सावंत
भाळवणी
5). हिम्मत हणमंत खुजे
नेमतवाड़ी भोसे
6 ). नारायण विश्वनाथ चौगुले बादलकोट
करकंब-74.568
'पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार" यामध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्रातील एकूण सात गटामधुन प्रत्येकी एका सभासद शेतकऱ्यांस " पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार" पुरस्काराने सन्मानित करणेत येते. यामध्ये
2022-23 मध्ये ज्या सभासद शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. त्या प्रत्येक गटामधून कमीत कमी खर्चामध्ये अधिक साखर उताऱ्याचा व अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांस प्रत्येकी रक्कम रु.25111/- सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा देऊन सपत्निक गौरविण्यात येणार आहे.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी हे म्हणाले की, ही स्पर्धा आम्ही गेले पाच वर्षांपासून कै. सुधाकरपंत परिचारक यांचे संकल्पनेमथुन व कारखान्याचे चेअरमन . आमदार प्रशांत परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली चालू केलेली आहे. स्पर्धेची सुरुवात लागण हंगाम सुरु झालेनंतर करीत आहोत. जे शेतकरी पूर्व हंगाम व सुरु हंगामामध्ये ऊसाच्या लागणी करतात ते या स्पर्धेसाठी पात्र होते. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा शेतकरी कारखान्याचा सभासद असणे आवश्यक आहे. कारखान्याने ठरवून दिलेल्या को-86032. कोसी-671, vsi-08005 या ऊस जातींचीच ऊस लागण करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील शेतकऱ्यांनी ऊसाची लागण केल्यापासून ऊस तोडणीपर्यंत 100 गुणांची तपासणी विविध मुद्यांचे आधारे करणेत येऊन हे पुरस्कार देण्यात आले आहेत. पुढे ते म्हणाले ऊस लागण करतेवेळी पूर्व मशागतीपासून माती परिक्षण, चांगल्या बेणेमळ्यातील बेणेचा वापर, हिरवळीची खते, शेणखताचे स्लरीचा वापर, ठिबक सिंचन, जिवाणु खतांचा वापर, विविध द्रवरुप खतांच्या फवारण्या या सर्व बाबींचे मुल्यमापन करणे करीता स्वतंत्र कर्मचान्याची नेमनुक करणेत आली होती. या सर्व शेतकन्यांचा स्वतंत्रपणे आलेला खर्च याच्या तपशीलवार नोंदी वर्षभर ठेवण्यात आलेल्या होत्या. यामधून सर्वात कमी खर्च व अधिक रिकव्हरीचा अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
सदर पुरस्काराचे वितरण कारखान्याचे दि. 24/09/2023 रोजी होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये सकाळी.11.00 वाजता कारखाना कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन मा. आमदार प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये वितरीत करणेत येणार आहे. ही नाविन्यपुर्ण स्पर्धा सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक मालक यांचे व कारखान्याचे
व्हा. चेअरमन कैलास शंकरराव खुळे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धांचे मुल्यमापन
करणेत आले. स्पर्धेतील शेतकऱ्यांना कार्यकारी संचालक डॉ.. यशवंत कुलकर्णी , केन मैनेजर
संतोष कुमठेकर व ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांनी ऊस पीक येत असताना विविध
स्तरावरती मार्गदर्शन केले होते.
| श्रध्देय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीनुसार कारखान्याचे कामकाज सुरु असून, मोठ्या मालकांचे हरितक्रांतीचे स्वप्न पुर्ण करणेस आम्ही कटीबध्द आहोत. सन 2022-23 चे "ऊस भूषण पुरस्कार" जाहीर करताना मनस्वी आनंद होत असून, पुरस्कार प्राप्त सर्व सभासद बंधुचे हार्दिक अभिनंदन व ऊस उत्पादन वाढीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
. आमदार -. प्रशांत परिचारक
कमित कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक साखर उताऱ्याचा ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना हे पुरस्कार देण्यात येतात. या नाविन्यपुर्ण स्पर्धेमध्ये सहभागी सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुरस्कार प्राप्त शेतकन्यांना ऊस उत्पादन वाढीकरिता हार्दिक शुभेच्छा.. सदरचे पुरस्कार दि. 24/09/2023 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रदान करत आहोत.
डॉ. यशवंत कुलकर्णी कार्यकारी संचालक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा