संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्या जाहिरातींसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षेत बसण्याची संधी देण्यात येत आहे... या पध्दतीने सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्रमांक एसआरव्ही -२०२१/प्र.क्र.६१/ कार्या१२ हा जी आर १७ डिसेंबर २०२१ रोजी काढला आहे.
ह्याच जीआर चा आधार घेत सरळ सेवेप्रमाणे पोलीस पाटील भरती मध्ये दोन वर्षांची सुट द्यावी. अशी मागणी सुरज वनसाळे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग ,पुणे- आणि बारामती उपविभागीय अधिकारी व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रत्येक अधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या भरतीची प्रक्रिया चालू आहे. उमेदवारांना कमीतकमी वयोमर्यादा २५ व जास्तीत जास्त ४५ ठेवली आहे. मात्र कोरोना कालावधीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे उमेदीचे वय निघून गेले आहे. त्यामुळे उमेदवारांना इच्छा असुनही ही परिक्षा देता येत नाही. त्यामुळे इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा