Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

श्रीपुर महाळुंग मध्ये डेंगू चे रुग्ण नगरपंचायत कसल्याच प्रकारे दखल घेत नसल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप

 


ज्येष्ठ पञकार--श्रीपूर

बी.टी.शिवशरण,

 टाइम्स 45 न्यूज मराठी

                        श्रीपूर महाळुंग परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू ची लागण झालेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत या संदर्भात महाळुंग श्रीपूर नगरपंचायत जराही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे एवढी उदासीनता व नाकर्तेपणा नगरसेवक पदाधिकारी अधिकारी यांच्या मध्ये कशामुळे आला आहे याची चर्चा होत आहे डास निर्मूलन फवारणी करण्याची अनेकदा मागणी करूनही ते जराही लक्ष देत नाहीत या संदर्भात आरपीआय नेते शामराव भोसले यांनी महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मधील अनास्थेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तक्रारींना सामोरे जावे लागत आहे तसेच डेंग्यू मलेरिया मुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनता त्रस्त आहे याकडे नगरपंचायतने जाणूनबुजून दुर्लक्ष करत असतील तर त्यांचे विरोधात आरपीआयचे वतीने सर्व समाजातील नागरिकांचा धडक मोर्चा काढून जाब विचारला जाईल असा इशारा दिला आहे मराठीत एक म्हण आहे वरमायच शिंदळ तर वरहाड शिंदळ तद्वत नगरपंचायत मध्ये कोण कोणाला विचारत नाही कोणीच कामे करत नाहीत अधिकारी संबंधित खात्याचे अधिकारी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या बाबतीत पहिल्या पासून ओरड आहे त्यात कसलीही सुधारणा झाली नाही नागरिकातुन असे बोलले जात आहे की नगरपंचायत पेक्षा पहिली ग्रामपंचायत होती तीच बरी होती नगरपंचायत मध्ये सर्वसामान्य माणूस गेला तर त्याला योग्य वागणूक दिली जात नाही त्यांच्या तक्रारी ची दखल घेतली जात नाही अशा तक्रारींचा पाढा नागरिकांतून वाचला जात आहे एकंदरीत निर्णयक्षमता अकार्यक्षमता व चालढकपणा यातच नगरपंचायत चा कारभार रेंगाळलेला पहायला मिळत आहे.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा