इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
- बारामती शहरा मध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त निघणारा जुलूस व श्री गणेश विसर्जन एकाच दिवशी 28 सप्टेंबरला येतअसल्या कारनामुळे पैगंबर मोहम्मद जयंती जुलूस 1 ऑक्टोंबरला काढायचा एकमुखाने निर्णय झाला. त्याच बरोबर डीजे मुक्त पैगंबर जयंती साजरी करायचेही जलासा कमिटी कडून आव्हान करन्यात आले.
बारामती मध्ये आत्तापर्यंत सर्व समाजाचे लोक एकत्र नांदत आलेत. कुठलाही धार्मिक तेढ या शहराने पाहिला नाही. सगळे मिळून एकमेकांचे सण-उत्सव साजरे करतात. पण मागच्या काही दिवसात राज्यात घडलेल्या आणि घडत असलेल्या घटनांमुळे ठरवून हे सगळं केलं जातंय, असं दिसून येतंय. कोण घडवून आणत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
यावर्षी एकाच दिवशी 28 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद येत आहे. बारामती शहरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा म्हणून मुस्लिम बांधवांनी 28 सप्टेंबर या तारखेला निघणारी मिरवणूक (जुलूस) 1 ऑक्टोंबरला काढण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सर्वच ठिकाणी अशापद्धतीने सलोख्याने राहणारे हिंदू-मुस्लिम बांधव आहेत. पण काही अराजक माजवणारे घटक सगळीकडे असतात. म्हणून त्यांना फाट्यावर मारण्यासाठी असे निर्णय गरजेचे आहेत.
निवेदन देताना:-
समाजाकडून ईद ए मिलादुन्नबी जयंती उत्सव जलसा कमिटीतर्फे असिफ खान, कासम कुरेशी, जब्बार पठाण, मुनीर तांबोळी, युसूफ इनामदार, अमजद बागवान, अन्सार शिकिलकर, असलम रज्जाक तांबोळी, अबरार खान, अकरम, बागवान, समीर शेख, मोहीन शेख, मुजाहीद शेख आदींनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांची भेट घेत चर्चा करून दि. 1 ऑक्टोबर रोजी बारामतीत डीजेमुक्त जयंती करण्याचा निर्णय घेतला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा