महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील उस्मानाबादची नंबर १ची जोडी खासदार -ओमराजे निंबाळकर, आमदार- कैलास पाटील.
---आतिक सय्यद (शिवसैनिक)
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
महाराष्ट्रातील राजकीय मंडळी पक्ष व सरकार बदलण्यात व्यस्त आहेत, तर काही आमदार मंत्री होण्यासाठी धडपड करत आहेत, काही आमदार सूट शिवण्यात व्यस्त आहेत, आणि शेतकरी वर्ग संकटात असताना मंत्रीमंडळातील बेजवाबदार मंञी ,आमदार , दही हंडी सण पुढे करून हसत गाजत उत्सव साजरा केला आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे .
बेरोजगारी वाढली असताना युवकांना रोजगार द्यायचं सोडून शेतकरी वा युवकांना वाऱ्यावर सोडून युवकांची दिशाभूल करून मंत्रीमंडळ नाच गाण्यात व्यस्त आहेत, हे दुर्दैवच नाही तर काय आहे..? शिवाय पावसाळ्याचे दिवस संपत येत असून अद्याप हवा एवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह मजूर छोटे मोठे व्यावसायिक सर्वच वर्ग त्रस्त झाले आहेत त्यांची सरकारला चिंता नाही अथवा अद्याप सरकारने दुष्काळ ही जाहीर केला नाही त्यामुळे जनता अतिशय त्रस्त झाली आहे
खासदार-- ओमप्रकाश दादा राजेनिंबाळकर व आमदार-- कैलास दादा पाटील यांचा आम्हाला अभिमान आहे कारण
ज्या शिवसैनिकांनी व मतदारांनी दोघांना निवडून दिले त्यांच्यासोबत गद्दारी न करता,
50 खोक्याच्या अमिषाला बळी न पडता त्याला लाथ मारून, मातोश्रीशी इमान राखत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच एकनिष्ठ राहिले. तसेच
या दोन्ही वाघानीं शेतकरी संकटात असताना त्यांच्या मुलांना, गोरगरीबच्या मुलांना, सर्वसामान्याच्या मुलांना कसा रोजगार मिळेल या प्रयत्नात होते ते काल आणि आज नौकरी महोत्सव घेऊन युवकांना जाॕब कार्ड देऊन सिद्ध केले
सर्वसामान्यांच्या मुलांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल दोन्ही दादांचे जिल्ह्यातील युवक त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत आहेत.
आतिक सय्यद
( शिवसैनिक बेंबळी )
9595626210
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा