टाइम्स 45 न्युज मराठी
मो;--9730 867 448
नियमबाह्य आणि उंच -अनियमित स्पीडब्रेकर मुळे उद्योजक असणाऱ्या विजय मगदूम यांचा बळी गेला . बिरनाळे कॉलेज समोरील या चुकीच्या "स्पीडब्रेकर" मुळे आणखी "अपघात "होऊ नये म्हणून मी सडेतोड -धारदार - समाजप्रबोधनाचा "लेख" लिहिला होता . या स्पीडब्रेकर चा पाठपुरावा केला होता . महापालिका आणि आयुक्त (प्रशासक ), नगरसेवक यांनी "पुढाकार" घेऊन हा स्पीडब्रेकर उखडून टाकला. व भविष्यात होणाऱ्या अपघातांची "मालिका" थांबवली याबद्दल आयुक्त सुनील पवार यांचे हार्दिक आभार - अभिनंदन !
त्याशिवाय माळी चित्रमंदिर समोरील स्पीडब्रेकर ही महापालिकेने हटवले आहेत . सांगलीत उंच - जीवघेणे स्पीडब्रेकर "शोधून" ते देखील उध्वस्त करणे ही काळाची गरज आहे .
मालू हायस्कुल समोर देखील मोठा स्पीडब्रेकर आहे . महिन्यात तेथे एक अपघात होतो .महापालिकेने तो देखील उखडून टाकायला हवा .महापालिका क्षेत्रात जेथे -जेथे स्पीडब्रेकर असतील तेथे आवर्जून पांढरे पट्टे मारायला हवेत. जेणेकरून रात्री -अपरात्री वाहनधारकांना स्पीडब्रेकर दिसू शकतील . कायद्यानुसार स्पीडब्रेकर ची उंची ही केवळ 6 इंच आहें. आणि रुंदी 1 फूट आहे .
अधिकाऱ्यांनी सर्व स्पीडब्रेकर्स चा सर्व्हे केल्यास महापालिका क्षेत्रात सऱ्हास "1 - 1 फूट उंच " व अनियमित स्पीडब्रेकर आढळतील ! तेदेखील महापालिकेने उखडून टाकावेत .पुनःश् महापालिका आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन -आभार !
इकबाल बाबासाहेब मुल्ला
( पत्रकार )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा