अकलूज ---प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
सार्वजनिक मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून गोरगरिबांच्या उपयोगी पडेल असे उपक्रम राबविले जावेत असे आवाहन जयसिंह मोहिते पाटील यांनी केले.ते अकलूज येथील लोहार गल्लीतील श्री शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या अन्नदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
कोजागिरी पोर्णिमा निमित्त श्री शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडाळाने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दोन हजार भाविकांनसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.देवीची आरती झाल्यानंतर एकशे एक महिलांची खण नारळाने ओटी भरून देवीचे नाम जप करून महाप्रसादाचा पहिला मान सुहासिनींना देण्यात आला.या वेळी मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांनी मंडळास भेट दिली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष समीर माने यांनी बाळदादांचा सत्कार केला.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष मन्मथ पालखे खजिनदार अभिषेक चाबुकस्वार,कार्याध्यक्ष विनायक माने सचिव अमर सोनके, विनायक चव्हाण उपस्थित होते.यावेळी बाळदादांनी मंडळातील तरूण कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक केले व लहान मुलांचे नऊ दिवसाच्या नवरात्र उत्साहात कोण कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याची विचारना करून मंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा