संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माज़ी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील आणि संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली कर्नल समीर कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी "राष्ट्रीय प्रवक्ते" म्हणून नियुक्ती देण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या "राज्यप्रमुख" पदी मा. बाबासाहेब पंढरीनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आणि सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कॅप्टन वसंत आजमाने यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सैनिक सेलचे प्रमुख मार्गदशक तसेच १९७१ लढाईचे वार हीरो, पाकिस्तानला लढाईच्या मैदानावर धुळीस लावणारे सैनिकांचे प्रेरणास्थान कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली या नियुक्तया देण्यात आल्या, वरील सर्व सदर नियुक्ती पत्र शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते देण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, राज्याचे माज़ी मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष्या सौ रोहिणीताई खड़से, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार खुशालराव बोपचे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सैनिक सेलच्या राज्यप्रमुख (महिला) सौ मेघाताई कुलकर्णी, ग्राहक सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय सूर्यकांतजी गवळी, प्रदेश सरचिटणीस मा. रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस मा आदितीताई नालावडे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, हे सर्व मान्यवर देखील उपस्थित होते, तसेच महाराष्ट्रातील शेकडो विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला यांच्यासह प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या "राज्यप्रमुख" नियुक्ती केल्याने व सेलची स्थापन झाल्याने पक्षातील कार्यकर्त्यात जोश निर्माण झाला असून निवडीबद्दल अभिनंदन होत आहे. यावेळी माजी सैनिक सेलचे पदाधिकारी मा. विष्णु कोरे, मा. बाबू एडके, मा. शहाजी जजाधव, मा. नंदकुमार कोळसे, मा. सुरज घाडगे,मा. जवामन जंजाळ, मा.संदीप देसाई, मा.मधुर रमेश, मा. नारायण तुपे, मा. आनंदराव होंगे, मा. रवींद्र दांडगे, मा. रंगनाथ खरात, मा.अंबादास मोरे, मा. अंकुश वराडे, मा.गफर पठाण, मा. भिमराज आरेकर, मा. डी.जी कुंभार, मा. विठ्ठल राजपूत,मा. विलास दगडे हे सर्व उपस्थित होते.
मा. बाबासाहेब जाधव (सैनिक सेल फाउंडर)
राज्यप्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सैनिक सेल
महाराष्ट्र प्रदेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा