अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध व अग्रेसर असलेल्या अकलूज येथील अॕपेक्स हॉस्पिटलच्या संचालिका नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रेवती नितीन राणे यांना नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय एम एस सिग्नेचर अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
एम एस सिग्नेचर अवॉर्ड हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून, यासाठी जगभरातून ४४२ लोकांनी आवेदन केले होते, त्यामधील भारत,श्रीलंका, सोमालिया,केनिया येथील ५२ निवडक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कारांची निवड करण्यासाठी अमेरिका, नाॅर्वे,केनिया,लंडन येथील प्रख्यात परीक्षक नेमण्यात आले होते. त्यात सामाजिक कार्य,नृत्य, संगीत,वैद्यकीय क्षेत्रातील योगदान,सर्जनशीलता,विशेष नैपुण्य इत्यादी आठ श्रेणी होत्या. त्यातील ग्रामीण भागातील महिलांना उल्लेखनीय वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ.रेवती राणे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ.रेवती राणे यांनी माळशिरस,इंदापूर,माढा,पंढरपूर ,सांगोला,करमाळा,माण तालुक्यातील अनेक गर्भवती स्त्रियांची गुंतागुंतीची बाळंतपणे सुखरूप करून अनेक स्त्रियांचे व अर्भकांचे प्राण वाचवले आहेत. तसेच गेल्या पाच वर्षापासुन माफक दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा त्या ग्रामीण रुग्णांना यशस्वीरित्या देत आहेत.मुक्ता विडिओ सिरीज,तरुण पिढीसाठी घे भरारी व्याख्यानमाला,रक्त क्षयासाठी मिशन पिंक हेल्थ प्रोग्राम यासारख्या अनेक माध्यामातून त्या समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत.या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
एम एस सिग्नेचर अवॉर्ड हा डाॅ.मैथीली शरण या सुप्रख्यात भारतीय आर्मी डॉक्टर,थोर समाजसेवक यांच्या स्मृती प्रीत्यर्थ गेल्या तीन वर्षांपासुन "सुवाच" या सामाजिक संस्थेत मार्फत दिला जातोय.या पुरस्काराच्या २०२३ च्या ब्रँड अँबेसिडर केनिया येथील डॉ.मोनिका ओगुटू होत्या.
यावेळी सुवाच संस्थेचे संचालक डॉ.हिमांशू वर्मा, सेवाग्रामच्या डॉ.पूनम वर्मा , पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ.चंद्रकांत पांडव ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा