इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
- बावडा ग्रुप ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजच्या शेवटच्या दिवशी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. तेजश्री पाटील यांचा वार्ड पाचमधून अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक अधिकारी मल्लाप्पा ढाणे व तलाटी अमोल हजगुडे यांनी अर्ज स्विकारला.
बावडा ग्रुप ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जनतेतून सरपंच व सतरा सदस्य पदासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भारतीय जनता पक्षाच्या वतीने वार्ड क्रमांक पाचसाठी सौ तेजश्री उदयसिंह पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर यापूर्वी महेंद्र कवडे देशमुख व संतोष सूर्यवंशी यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे.
अर्ज दाखल करतेवेळी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मनोज पाटील, विकास पाटील, मयुरसिंह पाटील, माजी सरपंच किरण पाटील, धनश्री पाटील, राजश्री पाटील, समीर मुलाणी, मुनीर आतार, संतोष सुर्यवंशी, सचिन सावंत, पवन घोगरे, महेंद्र कवडे देशमुख आदी उपस्थित होते.
फोटो - बावडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना तेजश्री पाटील दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा